एकवीरा माता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:28 AM2021-06-11T04:28:01+5:302021-06-11T04:28:01+5:30

वाशिम : शहरातील गोंदेश्‍वर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एकवीरा माता संस्थानमधील सभामंडपाच्या कामास मंगळवारी प्रत्यक्ष शिवसेना पदाधिकाऱ्यांंच्या हस्ते सुरुवात ...

Ekvira Mata | एकवीरा माता

एकवीरा माता

Next

वाशिम : शहरातील गोंदेश्‍वर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एकवीरा माता संस्थानमधील सभामंडपाच्या कामास मंगळवारी प्रत्यक्ष शिवसेना पदाधिकाऱ्यांंच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.

खासदार गवळी यांच्या मार्गदर्शनात सामाजिक अंतर ठेवून प्रत्येकांनी मास्क लावून हा कार्यक्रम पार पाडला.

यावेळी परिसरातील नागरिक व भाविकांची बरेच दिवसांपासून मागणी होती. या मागणीची दखल घेत खासदार गवळी यांनी या सभामंडपाला निधी उपलब्ध करून दिला. त्यापैकी गोंदेश्‍वर भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पौराणिक एकवीरा माता संस्थानमधील या सभामंडपाचा येथील नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रम व मंगल कार्यासाठी उपयोगी पडणार आहे. या मंदिरामध्ये दरवर्षी धार्मिक उत्सव व महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. वाशिम शहरातील मोठ्या प्रमाणात भाविक येथे दर्शनासाठी येतात. या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, तालुकाप्रमुख रामदास मते, शहर प्रमुख गजानन भांदुर्गे, गजानन भुरभुरे, युवा सेना शहर प्रमुख गजानन ठेंगडे, बालाजी वानखेडे, नगरसेवक नागोराव ठेंगडे, नगरसेवक राजू भांदुर्गे, नगरसेवक पंकज इंगोले व गोंदेश्‍वर भागातील सर्व वरिष्ठ नागरिक व युवकांची उपस्थिती होती. सदर सभामंडप मंजूर केल्याबद्दल गोंदेश्‍वरवासीयांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Ekvira Mata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.