मंगरुळपीर शहरालगत महामार्गावरील पुलाच्या खड्ड्यात पडून वृद्ध गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 04:51 PM2018-12-09T16:51:22+5:302018-12-09T16:51:47+5:30
मंगरुळपीर (वाशिम) : कारंजा-मंगरुळपीरदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर पुल बांधण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून ६८ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना ९ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास शहरालगतच्या पंचशील नगरनजिक घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर (वाशिम) : कारंजा-मंगरुळपीरदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर पुल बांधण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून ६८ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना ९ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास शहरालगतच्या पंचशील नगरनजिक घडली. या कामाची माहिती देणारा फलक न लावल्याने हा अपघात घडला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने मंगरुळपीर-कारंजा या मार्गावर रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. या मार्गावर पूल बांधण्यासाठी अनेक दिवसांपासून खड्डा खोदण्यात आला आहे. तथापि, तेथे माहितीदर्शक फलकच नाही. मंगरुळपीर शहरातील जयसिंह राजारामसिंह रघुवंशी (६८) हे ९ डिसेंबर रोजी सकाळी सायकल लोटत शेतात जात असताना त्यांना मार्गावर पुलासाठी खोदलेला खड्डा सकाळच्या सुमारास दिसू शकला नाही. त्यामुळे ते सायकलसह खड्ड्यात पडले. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी तातडीने अकोला येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. सदर कामाच्या ठिकाणी कोणतेही सुरक्षा कठडे किंवा माहितीदर्शक फलक नसल्याने हा अपघात घडला.