शिरपूर, बोराळा येथील निवडणूक अविरोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:49 AM2021-02-17T04:49:13+5:302021-02-17T04:49:13+5:30

शिरपूर जैन ग्रामपंचायत सरपंचपदी राजकन्या संतोष अढागळे तर उपसरपंचपदी असलम इमाम परसुवाले यांची बिनविरोध निवड झाली आहे एकांबा ...

Election controversy in Shirpur, Borala! | शिरपूर, बोराळा येथील निवडणूक अविरोध!

शिरपूर, बोराळा येथील निवडणूक अविरोध!

Next

शिरपूर जैन ग्रामपंचायत सरपंचपदी राजकन्या संतोष अढागळे तर उपसरपंचपदी असलम इमाम परसुवाले यांची बिनविरोध निवड झाली आहे एकांबा येथे सरपंचपदी आस्विनी राहुल गवई तर उपसरपंचपदी विठ्ठल निवृत्ती गवळी यांची अविरोध निवड झाली. ढोरखेडा सरपंचपदी सुनिता दत्तात्रय ऊर्फ बबन मिटकरी तर उपसरपंचपदी शारदा रामेश्वर सावळे यांची निवड झाली. बोराळा (जा) येथे सरपंचपदी पुष्पा गजानन जटाळे व उपसरपंचपदी शोभा शेषराव सरनाईक हे दोन्ही अविरोध निवडून आले. उमरवाडी येथे सरपंच म्हणून कमलाबाई बबन जामकर तर उपसरपंच म्हणून शिवाजी अमृता जळके, वारंगी येथे सरपंच पदाचा उमेदवार मिळाला नाही तर उपसरपंच म्हणून लक्ष्मी राजकुमार दहात्रे या निवडून आल्या. ग्रामपंचायत डही येथे सरपंच म्हणून शोभा राजेश बोरचाटे तर उपसरपंच म्हणून सुनीता आनंदा अवचार या निवडून आल्या. वरदरी बु. येथे सरपंच म्हणून सविता प्रेमदास जाधव तर उपसरपंच म्हणून जनाबाई विनोद राठोड हे निवडून आले. मेडशी येथे सरपंच म्हणून शेख जमीर तर उपसरपंच म्हणून सोनल धीरज मंत्री या निवडून आल्या.

Web Title: Election controversy in Shirpur, Borala!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.