निवडणूक कर्मचा-यांना मिळाले नाही मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:57 AM2021-02-26T04:57:36+5:302021-02-26T04:57:36+5:30

........................ सेवा भवन उभारण्याची मागणी वाशिम : मोहजाबंदी येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणून सेवा भवन ...

Election staff did not receive any honorarium | निवडणूक कर्मचा-यांना मिळाले नाही मानधन

निवडणूक कर्मचा-यांना मिळाले नाही मानधन

Next

........................

सेवा भवन उभारण्याची मागणी

वाशिम : मोहजाबंदी येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणून सेवा भवन उभारावे, अशी मागणी स्थानिक ग्रामपंचायत पदाधिका-यांनी प्रशासनाने बुधवारी निवेदनाद्वारे केली.

...........................

शेकडो शेतकरी मदतपासून वंचित

मेडशी : परिसरात गतवर्षी परतीच्या पावसामुळे हजारो एकरावरील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असे असताना अनेकांना अद्याप मदत मिळालेली नाही. याकडे प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.

..............

रिसोड रस्त्याचे काम संथ गतीने

वाशिम : येथून रिसोडकडे जाणा-या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची एक बाजू खोदून ठेवल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. कामाला गती देण्याची मागणी महेश गहुले यांनी मंगळवारी संबंधित विभागाकडे केली.

..................

बस थांब्यावर होतेय गर्दी

वाशिम : सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वाशिम शहर कडेकोट बंद होण्यासह वाहनांची वर्दळही कमी होत आहे. अशा स्थितीत वाशिम ते रिसोड मार्गावर असलेल्या बस थांब्यावर रिसोडकडे जाणा-या प्रवाशांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

...................

दुकाने बंद; रस्ते निर्मनुष्य

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दुकाने सुरू ठेवण्यास सायंकाळी ५ वाजतापर्यंतचीच मुदत देण्यात आली आहे. त्याचे वाशिम शहरात तंतोतंत पालन होत असून ५.३० वाजेपर्यंतच सर्व दुकाने बंद होऊन रस्ते असे निर्मनुष्य होत आहेत.

.................

नियमाचे उल्लंघन; दंडात्मक कारवाई

किन्हीराजा : दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करणाया जवळपास २२ जणांवर गत दोन दिवसांत पोलिसांनी कारवाई केली. किन्हीराजा ते मालेगाव या रस्त्यावर पोलिसांची चमू कारवाईसाठी तळ ठोकून असल्याचे दिसून येत आहे.

..............

कोरोना चाचणी करण्याचे आवाहन

वाशिम : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सर्दी, ताप, खोकला, घसादुखी आदी लक्षणे असणाºयांनी तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणा-यांनी तातडीने कोरोना चाचणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने बुधवारी केले.

..............

स्वतंत्र कार्यालय देण्याची मागणी

वाशिम : गावपातळीवरील महसूल विभागाचा कणा असलेल्या तालुक्यातील सुमारे ३० तलाठ्यांना बसण्याकरिता कार्यालय आवश्यक आहे. त्यासाठी मात्र स्वतंत्र जागा व इमारत नाही. ही व्यवस्था देण्याची मागणी तलाठ्यांमधून होत आहे.

Web Title: Election staff did not receive any honorarium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.