पांगरी येथे विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 04:31 PM2019-07-08T16:31:51+5:302019-07-08T16:33:09+5:30

विद्यार्थ्यांच्या अंगी यावीत म्हणुन विद्यालयात गुप्त पध्दतीने मतदान घेण्यात आले.

Election of student representatives at Pangri school | पांगरी येथे विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणूक

पांगरी येथे विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
करंजी (वाशिम) : नजीकच्या पांगरी नवघरे येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी निवडीसाठी निवडणुक पार पडली.
लोकशाहीची मुल्ये विद्यार्थीदशेतच विद्यार्थ्यांच्या अंगी यावीत म्हणुन विद्यालयात गुप्त पध्दतीने मतदान घेण्यात आले. ही प्रक्रीया प्राचार्य राधेशाम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनार्धन इंगळे होते. निवडणुक अधिकारी म्हणुन विलास खराटे, नवनाथ मुठाळ, रामेश्वर मानवतकर, रवि जंजाळकर, वैशाली धंदरे, उमेश लहाने, गणेश बाजड उपस्थित होते. यावेळी इयत्ता ५ ते १० वीच्या विद्यार्थ्यानी मतदान केले. यावेळी माधुरी नवघरे विद्यार्थी प्रतिनिधी तर उपप्रतिनिधी म्हणुन नारायण बोरकर यांना विजयी घोषीत केले. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय नियमावलीत शपथ देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी घेण्यासाठी विभाग प्रमुख गणेश वाझुळकर, अनंत जहॉगीरदार, बळीराम नवघरे, सुनंदा चव्हाण आदिंनी परिश्रम घेतले.

Web Title: Election of student representatives at Pangri school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.