रिसोड नगर परिषद उपाध्यक्ष पदासाठी २४ जानेवारीला निवडणुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 04:45 PM2019-01-23T16:45:09+5:302019-01-23T16:45:41+5:30
रिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी २४ जानेवारीला निवडणुक होत आहे. कुणाकडेही स्पष्ट बहुमत नसल्याने आणि मध्यंतरीच्या काळात नाट्यमय घडामोडी घडल्याने उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता लागून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी २४ जानेवारीला निवडणुक होत आहे. कुणाकडेही स्पष्ट बहुमत नसल्याने आणि मध्यंतरीच्या काळात नाट्यमय घडामोडी घडल्याने उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता लागून आहे.
१० डिसेंबर २०१८ रोजी रिसोड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहिर झाला होता. अटितटीच्या झालेल्या या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीने नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या ९ पदांवर विजय मिळविला होता तर काँग्रेस तीन, शिवसेना तीन, भारिप-बमसं दोन आणि अपक्ष तीन असे पक्षीय बलाबल आहे. कुणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नाट्यमय घडामोडी घडल्या. वाशिम जिल्हा जनविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मध्यंतरी सर्व जण एकत्र येण्याच्या वेगवान घडामोडीही घडल्या. त्यानंतर जनविकास आघाडीच्या नेत्यांनीदेखील बहुमतासाठी आवश्यक असलेले संख्याबळ जूळविण्याकरीता मोर्चेबांधणी केली. काँग्रेस, शिवसेना, अपक्ष व भारिप-बमसं मिळून उपाध्यक्ष पद काबीज केले जाते की अपक्ष, भारिपला सोबत घेऊन जनविकास आघाडीचा उमेदवार उपाध्यक्षपदावर विराजमान होतो, याचा फैसला गुरूवार, २४ जानेवारी रोजी होणार आहे. नाट्यमय घडामोडीमुळे उपाध्यक्ष कुणाचा होणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.