वाकद ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:18 AM2021-02-18T05:18:14+5:302021-02-18T05:18:14+5:30
एका गटाकडून सात, तर दुसऱ्या गटाकडून सहा उमेदवार विजय झाले होते. त्यामुळे सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे अनेकांचे ...
एका गटाकडून सात, तर दुसऱ्या गटाकडून सहा उमेदवार विजय झाले होते. त्यामुळे सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे अनेकांचे मत होते, परंतु गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता तसेच विविध समस्यांवर सर्वानुमते कामे करण्यासाठी काही अनुभवी सदस्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रस्ताव दर्शविल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीमध्ये सरपंचपदी युवा नेतृत्व म्हणून अमोल प्रदीपराव देशमुख यांची, तर उपसरपंचपदी प्रयागबाई शिवाजी थोरात यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्यामुळे तेराही ग्रा.पं. सदस्यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून निकित वार यांनी काम पाहिले. त्यांना वाकद ग्रामपंचायतच सचिव काकडे, तलाठी कल्याणकर यांनी सहकार्य केले. यावेळी ठाणेदार एस.एम. जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गवई, वाकद बीट जमादार नारायण वाघ यांनी बंदोबस्त ठेवला होता.