आज निवडणुकीतील चित्र होणार स्पष्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 08:11 PM2017-09-26T20:11:27+5:302017-09-26T20:11:56+5:30

वाशिम : ७ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६०५८ उमेदवारी अर्ज कायम असून, २७ सप्टेंबर रोजी कोण माघार घेणार यावर निवडणुकीतील पुढील चित्र अवलंबून आहे. दरम्यान, बंडखोरी होऊ नये तसेच ग्रामपंचायत अविरोध करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक नेते, आघाडी प्रमुखांतर्फे माघार घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली जात असल्याचे दिसून येते. 

Election will be clear today! | आज निवडणुकीतील चित्र होणार स्पष्ट !

आज निवडणुकीतील चित्र होणार स्पष्ट !

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक माघार घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ७ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६०५८ उमेदवारी अर्ज कायम असून, २७ सप्टेंबर रोजी कोण माघार घेणार यावर निवडणुकीतील पुढील चित्र अवलंबून आहे. दरम्यान, बंडखोरी होऊ नये तसेच ग्रामपंचायत अविरोध करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक नेते, आघाडी प्रमुखांतर्फे माघार घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली जात असल्याचे दिसून येते. 
आगामी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची निवडणूक  ७ आॅक्टोबर रोजी होत आहे. वाशिम तालुक्यातील ५१ ग्राम पंचायती, कारंजा ५३, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्यातील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. २२ सप्टेंबरपर्यंत दाखल ६१६२ उमेदवारी अर्जाची सोमवार, २५ सप्टेंबर रोजी तहसिल स्तरावर छाननी करण्यात आली. छाननीत १०४ अर्ज बाद झाल्याने आता ६०५८ अर्ज कायम आहेत. यामध्ये वाशिम तालुक्यातील सदस्य पदाचे ९५६ व सरपंच पदाच्या २९४ अशा एकूण १२५० अर्जांचा समावेश आहे. कारंजा तालुक्यातील सदस्य पदाचे ७४१ व सरपंच पदाच्या २३८ अशा एकूण ९७९ अर्जांचा समावेश आहे. मानोरा तालुक्यातील सदस्य पदाचे ६५९ व सरपंच पदाच्या १८५ अशा एकूण ८४४ अर्जांचा समावेश आहे. रिसोड तालुक्यातील सदस्य पदाचे ८५३ व सरपंच पदाच्या २१६ अशा एकूण १०६९ अर्जांचा समावेश आहे. मंगरूळपीर तालुक्यातील सदस्य पदाचे ६३६ व सरपंच पदाच्या २०२ अशा एकूण ८३८ अर्जांचा समावेश आहे. मालेगाव तालुक्यातील सदस्य पदाचे ८३२ व सरपंच पदाच्या २४६ अशा एकूण १०७८ अर्जांचा समावेश आहे. 
२७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. अंतिम मुदतीपर्यंत किती उमेदवार माघार घेतात, यावर निवडणुकीतील चित्र अवलंबून राहणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकी ही पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी पक्षाचे समर्थक, पक्षाच्या कार्यकर्त्यांना ग्राम पंचायतच्या सत्तेत बसविण्यासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारीप-बमसं या प्रमुख पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसून येते. आगामी डिसेंबर २०१८ मध्ये पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत निवडणूक ही रंगीत तालिम ठरत असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची कसोटी लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक अविरोध करणे तसेच बंडखोरांना शांत करण्यासाठी स्थानिक नेते, आघाडी प्रमुखांनी उमेदवारांनी माघार घेण्याकरिता प्रयत्न चालविल्याचे दिसून येते. या प्रयत्नांना कितपत यश येते, हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर स्पष्ट होणार आहे. 

Web Title: Election will be clear today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.