पहिल्या टप्प्यात १९२ संस्थांच्या निवडणुका
By admin | Published: October 30, 2014 12:01 AM2014-10-30T00:01:39+5:302014-10-30T00:19:56+5:30
सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेध.
वाशिम : विधानसभा निवडणुकीचा धुराळा खाली बसण्यापूर्वीच ग्रामीण राजकारणाचे केंद्रबिंदू असणार्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातर्फे संस्थांची प्राथमिक स्वरू पाची चाचपणी सुरू झाली असून, निवडणुकीस पात्र असणार्या संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होतील. पहिल्या ट प्प्यात १९२ संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. केंद्र शासनाने १२ जानेवारी २0१४ च्या अधिसुचने अन्वये ९७ वी घटनादुरुस्ती केली आहे. ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार भाग ९ ब मध्ये सहकारी संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांची धामधुम सुरु होणार आहे. साधारण १0 नोव्हेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यातील १९२ सहकारी संस् थांच्या मतदार याद्या तयार केल्या जाणार आहेत. राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पुढील सहा ते आठ महिन्यात जिल्हय़ातील ३४४ सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात १९२ संस्थांच्या निवडणुका घेण्यात येतील. पहिल्या टप्प्यात ड वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने क, ब व अ वर्ग संस्थांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन आहे. वाशिम जिल्हय़ातील ब व क वर्गातील सर्व सेवा सहकारी संस्था सोसायटीच्या निवडणुका नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये प्राध्यान्याने घेण्यात येतील. परिणाम अकोला जिल्हा मध्यवर्ती बॅकेची निवडणूक साधारणत: जानेवारी किंवा फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर जाईल.