निवडणुकीत गावपुढा-याची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 07:41 PM2017-10-04T19:41:44+5:302017-10-04T19:43:01+5:30

मानोरा (वाशिम): येत्या ७ आॅक्टोंबर रोजी होवु घातलेल्या तालुक्यातील ४१ ग्रा.पं. च्या निवडणुकीमध्ये प्रथमच थेट जनतेतुन सरपंच निवडला जाणार असल्याने  अनेक गाव पुढाºयाची प्रतिष्ठापणाला लागली असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत समोरील निवडणुकीचे चित्र दडले आहे त्यामुळे  कोण बाजी मारेल हे ९ आॅक्टोंबरला समजणार आहे.

In the elections, the prestige of Gauppuda is to be achieved | निवडणुकीत गावपुढा-याची प्रतिष्ठा पणाला

निवडणुकीत गावपुढा-याची प्रतिष्ठा पणाला

googlenewsNext
ठळक मुद्देप्रथमच थेट जनतेतुन निवडला जाणार सरपंच कोण बाजी मारेल हे ९ आॅक्टोंबरला समजणार 

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम): येत्या ७ आॅक्टोंबर रोजी होवु घातलेल्या तालुक्यातील ४१ ग्रा.पं. च्या निवडणुकीमध्ये प्रथमच थेट जनतेतुन सरपंच निवडला जाणार असल्याने  अनेक गाव पुढाºयाची प्रतिष्ठापणाला लागली असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत समोरील निवडणुकीचे चित्र दडले आहे त्यामुळे  कोण बाजी मारेल हे ९ आॅक्टोंबरला समजणार आहे.
मानोरा तालुक्यातील ४१  ग्रामपंचायतीचा  मुदत संपल्याने येत्या ७ आॅक्टोंबर रोजी निवडणुक होत आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवश्ी मागे  घेवुन आज रोजी तालुक्यात ४१ ग्रा.पं.च्या निवडणुकी होत असुन १२७ प्रभागातुन ४३१ सदस्य निवडुन  द्यावयाचे आहे.त्यापैकी  तालुक्यात तहसीलदार डॉ.चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार १ ग्रा.पं. अविरोध झाली. १ सरपंच अविरोध , ग्रा.पं.सदस्य १२५ अविरोध झाल्याचे सांगितले. आता ४० ग्रामपंचायत मधुन ४० सरपंच निवडुन द्यावयाचे आहे. त्यासाठी १३९ उमेदवार रिंगणात आहे.३७ ग्रामपंचायत मधुन ३४१ ग्रामपंचायत सदस्य निवडुन द्यावयाचे आहे. त्यासाठी ५७८ उमेदवार रिंगणात ओह. विशेष म्हणजे  तालुक्यातील महत्वाचे ग्रा.पं. पंचायतचा यात समावेश आहे. यात माजी आ.अनंतकुमार पाटील यांची पोहरादेवी ,ग्रा.पं.  पं.स.सदस्य अशोक चव्हाण यांचे गाव असलेल्या भुली, जि.प.चे माजी सदस्य भाऊ नाईक यांचे भोयणी, भाजपाचे तालुकाध्यक्ष  ठाकुरसिंग चव्हाण तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंद चव्हाण यांची आमदरी  ग्रा.पं. , कारपा ग्रामपंचायतची अविरोधची परंपरा असुन यावेळी जनतेतुन सरपंच निवडला जाणार असल्याने ती खंडीत होवुन येथे निवडणूक होत आहे.  कृषी उत्पन्न बाजार समिती समितीचे संचालक राम राठोड स्वत: सरपंच पदाकरिता रिंगणात असुन अनुप जाधव, तसेच सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष व माजी सरपंच जयसिंग जाधव  रिंगणात आहे. जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष   प्रकाश राठोड यांची प्रतिष्ठा आसोला ग्रा.पं.मध्ये लागली आहे. सोयजना  ग्रा.पं.करिता विनोद चव्हाण, स्वत: सरपंच पदाकरिता रिंगणात असुन युवरारज चव्हाण यांची सरळ लढत होणार आहे. सावळी ग्रा.पं.करिता विज वितरण कंपनीचे सदस्य अनिल राठोड यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. तसेच धानोरा ग्रा.पं.मध्ये क ृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती निळकंठ घाटगे, कृउबासचे संचालक चव्हाण यांची प्रतिष्ठापणाला लागली. याही व्यतिरिक्त तालुक्यातील जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, गावपातळी वरील पुढारी,  कार्यकर्ते याची प्रतिष्ठापणाला लागली आहे. राजकीय पक्ष जरी या निवडणुकीपासुन प्रत्यक्ष दुर असते तरी अप्रत्यक्ष भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप बमसं,  शिवसेना , काँग्रेस, यावेळी ग्रामपंचायत  सार्वत्रिक  निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवाराची थेट जनतेतुन निवड होणार असल्यामुळे आपल्या विचाराचा उमेदवार निवडुन यावा यासाठी अप्रत्यक्ष बळ देत आहे. मानोरा तालुक्यात सुभाष ठाकरे, प्रकाश डहाके, अनिल राठोड, अरविंद इंगोले, युसुफ पुंजानी, राजेंद्र पाटणी, भावना गवळी, संजय राठोड आदि नेते कामास भिडलेले दिसून येत आहेत.

Web Title: In the elections, the prestige of Gauppuda is to be achieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.