ओबीसीचे आरक्षण पूर्ववत केल्याशिवाय निवडणूक घेऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:49 AM2021-09-17T04:49:10+5:302021-09-17T04:49:10+5:30
मानोरा : ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण पूर्वीप्रमाणे कायम झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, अशी मागणी मानोरा तालुका काँग्रेसने ...
मानोरा : ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण पूर्वीप्रमाणे कायम झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, अशी मागणी मानोरा तालुका काँग्रेसने १६ सप्टेंबर रोजी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविलेल्या निवेदनात केली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करून ओबीसीचे आरक्षण पूर्वीप्रमाणे झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये. केंद्र सरकारने ओबीसीचा इम्पिरियल डाटा वेळेत सादर न केल्याने ओबोसीचे नुकसान झाले आहे, असाही उल्लेख निवेदनात करण्यात आला. निवेदनावर काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अशोक करसडे, प्रकाश राठोड, तालुकाध्यक्ष इप्तेखार पटेल, नगराध्यक्ष बरखा बेग, गजानन राठोड, दिनेश मोरे, रामनाथ राठोड, वसंत भगत, अलताब बेग, ज्ञानेश्वर राठोड, सै. शब्बीर, शंकर राठोड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.