वाशिममध्ये ट्रॅक्टरच्या धडकेने तुटला विजेचा खांब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 03:24 PM2019-03-31T15:24:43+5:302019-03-31T15:24:48+5:30

वाशिम : शहराला विद्यूत पुरवठा केल्या जाणाºया उपकेंद्रानजिक उभा असलेला विजेचा खांब ट्रॅक्टरच्या धडकेत जमीनदोस्त झाला.

Electric pole broken by a tractor in Washim | वाशिममध्ये ट्रॅक्टरच्या धडकेने तुटला विजेचा खांब!

वाशिममध्ये ट्रॅक्टरच्या धडकेने तुटला विजेचा खांब!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहराला विद्यूत पुरवठा केल्या जाणाºया उपकेंद्रानजिक उभा असलेला विजेचा खांब ट्रॅक्टरच्या धडकेत जमीनदोस्त झाला. यामुळे रविवार, ३१ मार्च रोजी दुपारी १ वाजतापासून ‘टाऊन फिडर’वरून होणारा विज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. 
याबाबत प्राप्त माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास एम.एच.३७ ए ९१६८ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरने वाशिमच्या पुसद नाकास्थित विद्यूत उपकेंद्रानजिक असलेल्या विद्यूत खांबाला जोरदार धडक दिली. यात सदर खांब पूर्णत: जमिनदोस्त होण्यासोबतच विद्यूत वाहिन्याही तुटल्या. यादरम्यान सुरक्षिततेची खबरदारी म्हणून महावितरण उपअभियंता पी.बी. चव्हाण यांनी तातडीची पावले उचलत विद्यूत खांब सरळ करून घेण्यासह त्यावरील वाहिन्या बदलून घेण्याची कार्यवाही सुरू केली. मात्र, तब्बल अडीच ते तीन तासाचा अवधी उलटूनही हे काम पूर्ण झालेले नाही. वृत्त लिहिस्तोवर विद्यूत पुरवठा सुरळित झालेला नव्हता. या अडचणीमुळे नागरिकांना तापत्या उन्हात उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Electric pole broken by a tractor in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.