खासगी व्यक्तींकडून केली जाताहेत विद्युतची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:07 AM2021-05-05T05:07:36+5:302021-05-05T05:07:36+5:30
गावातील रोहित्र बिघडले असले तरी खासगी व्यक्तींना या ठिकाणी बोलावण्यात येत आहे. शिवाय गावातील विद्युत देयकाची वसुली गेल्या अनेक ...
गावातील रोहित्र बिघडले असले तरी खासगी व्यक्तींना या ठिकाणी बोलावण्यात येत आहे. शिवाय गावातील विद्युत देयकाची वसुली गेल्या अनेक दिवसांपासून लाइनमन नसल्यामुळे प्रलंबित आहे. त्यामुळे एक प्रकारे विद्युत कंपनीला नुकसान सहन करावे लागत आहे. तरीसुद्धा प्रशासनाकडून याबाबतची दखल घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महावितरण कंपनीतर्फे वाकद गावाला प्रभारी लाइनमन म्हणून देवडे यांना चार्ज देण्यात आला आहे. मात्र, त्यांच्याकडे इतरही गावांचा चार्ज असल्याने त्यांनाही वेळ देणे शक्य होत नाही. दूरध्वनीदेखील घेत नाहीत, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. बालखेड आणि वाकद या गावांमधील मार्चमधील वसूल केलेल्या बिलाचे पैसे अद्याप भरले नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत सहाय्यक अभियंता (ग्रामीण शाखा) रिसोड यांना विचारणा केली असता संबंधित कर्मचाऱ्यांनी अद्याप वाकद, बालखेडच्या वीजग्राहकांकडील बिलाचा भरणा विद्युत कंपनीकडे केलेला नाही. या गावांमध्ये काही बिघाड झाला तर मला स्वतः जाऊन दुरुस्ती करावी लागते. याशिवाय चारही गावांतील विद्युत ग्राहक यांच्या वारंवार तक्रारी येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.