वीजजोडणीपूर्वीच महिला शेतकऱ्याच्या नावे वीज बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:37 AM2021-03-22T04:37:50+5:302021-03-22T04:37:50+5:30
लाडेगाव येथील महिला शेतकरी इंदू यशवंतराव गादे यांनी आपल्या शेतातील कृषिपंपास वीजजोडणी मिळण्यासाठी मागील दीड ते दोन वर्षांपूर्वी अर्ज ...
लाडेगाव येथील महिला शेतकरी इंदू यशवंतराव गादे यांनी आपल्या शेतातील कृषिपंपास वीजजोडणी मिळण्यासाठी मागील दीड ते दोन वर्षांपूर्वी अर्ज करून कोटेशनचे पैसेही भरले. त्यानंतर नुकताच त्यांच्या शेतात १६ अश्वशक्ती क्षमतेचे ट्रान्सफाॅर्मर देण्यात आले; परंतु ते कार्यान्वित करण्यापूर्वी व त्यांनी विजेचा वापर करण्यापूर्वीच त्यांच्या हातात वीज बिल देण्याचा प्रताप महावितरणने केला आहे. इंदूबाई गादे यांना ५ हजार ५३० रुपये रकमेचे वीज बिल देण्यात आले असून, ते भरण्यासही सांगण्यात आले आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता, देण्यात आलेले चुकीचे वीज बिल रद्द करून न्याय देण्याची मागणी त्यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. न्याय न मिळाल्यास ग्राहक मंचात दाद मागण्याचा इशाराही सदर महिला शेतकऱ्याने दिला आहे.