वीज समस्यांनी त्रस्त शेतकरी धडकले ‘महावितरण’वर!

By admin | Published: March 30, 2017 02:42 AM2017-03-30T02:42:10+5:302017-03-30T02:42:10+5:30

१६ तासांच्या भारनियमनामुळे भुईमूग, संत्रा पीक धोक्यात

Electricity crisis hit farmers' Mahavitaran! | वीज समस्यांनी त्रस्त शेतकरी धडकले ‘महावितरण’वर!

वीज समस्यांनी त्रस्त शेतकरी धडकले ‘महावितरण’वर!

Next

वाशिम, दि. २९- अवास्तव भारनियमन, कृषी पंपांना अपुरा वीज पुरवठा, वारंवार वीज खंडित होणे आदी विजेच्या समस्यांनी त्रस्त झालेल्या वारंगी, गोकसावंगी, रिधोरा, मुंगळा येथील शेतकर्‍यांनी बुधवार, २९ मार्च रोजी महावितरणच्या मुख्य कार्यालयावर धडक मोर्चा काढून अधीक्षक अभियंत्याकडे उद्भवलेली समस्या निकाली काढण्याची गळ घातली.
वारंगी, गोकसावंगी, रिधोरा आणि मुंगळा या चार गावांमध्ये सध्या तब्बल १६ तास भारनियमन केले जात आहे. उर्वरित ८ तासांत २ ते ३ तासांपेक्षा अधिक वेळ विद्युत पुरवठा अधूनमधून खंडित होतो. यामुळे शेतात असलेले भुईमूग आणि संत्र्याचे पीक धोक्यात सापडले आहे. तथापि, मेडशी येथील ३३ केव्ही क्षमतेच्या रोहित्रावर क्षमतेपेक्षा अधिक ताण येत असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे वारंगी आणि गोकसावंगी येथे नवीन फिडर बसविण्याची मागणी शेतकर्‍यांनी यावेळी लावून धरली.
प्रमोद गंडागुळे, जुगलकिशोर कोठारी व नामदेव बोरचाटे यांच्या नेतृत्वात झालेल्या या मोर्चात अशोक दहात्रे, विनोद दहात्रे, धनंजय चतरकर, महादेव चतरकर, आनंद नाईक, शिवाजी केकन, संतोष दहात्रे, दलालधन दहात्रे, संतोष बोरचाटे, विजय उगले, अनिल इंगोले, शरद खंडागळे, बालाजी दहात्रे, बाबूराव चतरकर, दत्तराव बरवे, सुनील कदम, नितेश देशमुख, किसन जाधव, नीलेश दहात्रे, गजानन वानखडे, वैभव कदम, विजय हेंबाडे, अमोल निंबाळकर, संतोष कर्‍हाळे, बाळू कदम आदींसह इतर शेतकरी सहभागी झाले होते.

Web Title: Electricity crisis hit farmers' Mahavitaran!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.