बॅरेजेस परिसरातील विजेचा प्रश्न निघणार निकाली!

By admin | Published: April 1, 2017 02:34 AM2017-04-01T02:34:14+5:302017-04-01T02:34:14+5:30

ऊर्जा मंत्र्यांचे सुतोवाच; ९५.८९ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन

Electricity issue in the Barrages area will leave! | बॅरेजेस परिसरातील विजेचा प्रश्न निघणार निकाली!

बॅरेजेस परिसरातील विजेचा प्रश्न निघणार निकाली!

Next

सुनील काकडे
वाशिम, दि. ३१- जिल्ह्यातून वाहणार्‍या पैनगंगा नदीवर शासनाने ७१६.४२ कोटी रुपये खचरून ११ ठिकाणी बॅरेजेस उभारले. यामुळे कधीकाळी वाहून जाणारे पावसाचे पाणी ठिकठिकाणी अडवून ठेवणे शक्य झाले आहे; मात्र विजेअभावी हे बॅरेजेस ह्यवांझोटेह्ण ठरल्याची बाब सर्वप्रथम ह्यलोकमतह्णने उजागर केली. त्यावर मेहकर (जि. बुलडाणा) येथील आमदार संजय रायमुलकर यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करून हा प्रश्न लावून धरला. दरम्यान, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी त्यास दुजोरा देत यासंबंधी ९५.८९ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले.
वाशिम जिल्हा हा तापी व गोदावरी नदी खोर्‍याच्या दुभाजकावर येतो. जिल्हय़ात सिंचनाचा प्रचंड मोठा अनुशेष आजही कायम आहे. तो दूर करण्यासाठी पैनगंगा नदीवरील वरुड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ ठिकाणी ह्यबॅरेजेसह्णची कामे पूर्ण करण्यात आली. यामुळे वाशिम जिल्हय़ातील ५ हजार ५५४ हेक्टर व हिंगोली जिल्हय़ातील २ हजार १३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. डिसेंबर २0१५ मध्ये या प्रकल्पांना ह्यसुप्रमाह्ण प्रदान करून शासनाने ७१६.४२ कोटी रुपयांचा निधी प्रदान केला. त्यामुळे ही कामे वेळेत पूर्ण होऊन त्यात मोठय़ा प्रमाणात जलसाठा झाला आहे.
तथापि, सिंचनाच्या बाबतीत "माईलस्टोन" काम ठरू पाहणार्‍या "बॅरेजेस"च्या उपलब्धीमुळे शेकडो गावांमधील शेतकर्‍यांनी हरितक्रांतीचे स्वप्न रंगविणे सुरू केले; मात्र विजेच्या पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने कोट्यवधी रुपये खचरून उभारण्यात आलेल्या ह्यबॅरेजेसह्णची उपयोगिता शून्य ठरली आहे. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने वारंवार वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेत मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. त्यास उत्तर देताना ऊर्जामंत्र्यांनी सांगितले, की वाशिम जिल्हय़ात पैनगंगेवरील बॅरेजेससह अनेक लघू पाटबंधारे योजना व उपसा सिंचन योजना पूर्णत्वास येत आहेत. त्यानुषंगाने किमान आठ हजार कृषी पंपांची मागणी येण्याची शक्यता असून, त्यास वीज पुरवठा देण्याकरिता विजेच्या पायाभूत सुविधा उभाराव्या लागणार आहेत. त्यासाठी ९५.८९ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लवकरच विजेसंदर्भातील हा प्रश्न निकाली निघण्याचे संकेत असून, यामुळे वाशिम आणि हिंगोली या दोन्ही जिल्हय़ांतील शेतकर्‍यांची सोय होणार आहे.

विजेसंदर्भातील या कामांना द्यावे लागणार प्राधान्य
गणेशपूर, जयपूर आणि नारेगाव या तीन ठिकाणी ३३/११ ह्यकेव्हीह्णचे तीन वीज उपकेंद्र उभारावे लागणार आहेत. त्यावर पाच ह्यएमव्हीएह्णचे सहा ट्रान्सफार्मर आणि १00 ह्यकेव्हीएह्णचे ९४२ ट्रान्सफार्मर बसवावे लागणार आहेत. याशिवाय अडोळी आणि वाई येथे पाच ह्यएमव्हीएह्णचे दोन अतिरिक्त ट्रान्सफार्मर बसविणे, नव्याने तयार होणार्‍या उपकेंद्रापर्यंंत वीज पुरवठा करण्यासाठी ३३/११ ह्यकेव्हीह्णची विद्युत लाइन टाकण्यासह इतरही बरीच कामे प्रथम प्राधान्याने करावी लागणार आहेत.

Web Title: Electricity issue in the Barrages area will leave!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.