विजेचा लंपडाव, नागरिक त्रस्त
By admin | Published: July 3, 2014 11:15 PM2014-07-03T23:15:30+5:302014-07-04T00:05:13+5:30
भारनियमनासह अतिरिक्त भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.
वाशिम: शहरात भारनियमनासह अतिरिक्त भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. भारनियमनाव्यतिरिक्त विद्युत पुरवठा खंडित होत असून विजेच्या नियमितच्या लंपडावामुळे शहरवासी वैतागले आहेत. रात्रीच्यावेळी वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्यामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती तर अतिशय बिकट आहे. जिल्हयाचे ठिकाण असलेल्या वाशिम शहरामध्ये अनेकदा विद्युत पुरवठाच राहत नसल्याने विद्युत पुरवठयावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. काही भागातील विद्युत पुरवठा पहाटेच गुल होत असल्याने अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत. जोरदार पाउस अद्याप पडला नसला तरी थोडा जरी पाऊस आला की विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने पावसाहयात काय परिस्थिती असेल याबाबत नागरिक बोलत आहेत. ग्रामीण भागामध्ये येणार्या फिडरवर १४-१४ तास भारनियमन केल्याने ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. अनेक ठिकाणच्या ग्रामस्थांनी रात्रीचे भारनियमन कमी करा असे निवेदन संबधितांना दिले आहे याचाही काहीच फायदा होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. ग्रामीण भागात काही फिडरवर सकाळी ५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत असे १४ तासाचे भारनियमन सुरू आहे. वाशिम शहरातील नविन वसाहतीमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला की, लाईनमन फिरकूनही पाहत नसल्याने या भागतील नागरिक त्रस्त झाले आहेत. लाईनमन संदर्भात कीतीही ओरड केली तरी काहीच परिणाम होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. वरिष्ठांनी याकडे लक्ष देवून वीजेचा लंपडाव थांबविण्याची मागणी आहे