पळसखेड येथे वीज देयक वसुली मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:29 AM2021-07-18T04:29:19+5:302021-07-18T04:29:19+5:30
घरगुती वीज देयक माफ होणार या आशेने ग्राहकांनी वीज वापराचे देयक थकीत ठेवल्याने थकबाकी झाली. स्थानिक लाईनमन पोपळघट यांनी ...
घरगुती वीज देयक माफ होणार या आशेने ग्राहकांनी वीज वापराचे देयक थकीत ठेवल्याने थकबाकी झाली. स्थानिक लाईनमन पोपळघट यांनी लोकांना वीज बिल भरण्यासंदर्भात विनवणी केल्यानंतरही ग्राहकांवर कुठलाच परिणाम झाला नाही. कनिष्ठ अभियंता हरीश गिरे यांच्या चमूने पळसखेड येथे फिरून लोकांकडून वसुली केली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अर्जुन पाटील खरात यांनी गावकऱ्यांसमवेत त्यांना सहकार्य करून बिल भरण्यास सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत कर्मचारी पोपळघट, मोरे, साबळे, गायकवाड, देशमुख, मुंडे, कंत्राटी कामगार कोकाटे आदींनी पळसखेड येथे घरगुती वीज बिलाची वसुली केली. काही ग्राहकांनी सोमवारी वीज बिल भरण्याची विनंती केली. त्यावेळी कनिष्ठ अभियंता हरीश गिरी यांनी लोकांना सोमवारपर्यंत बिल भरण्याचे आवाहन केले.