कृषीपंप जोडणीविनाच आकारले वीज देयक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:30 PM2019-01-25T12:30:22+5:302019-01-25T12:30:36+5:30

देपूळ (वाशिम ): शेतामध्ये कूपनलिका खोदून महावितरणकडे २०१५ ला वीजजोडणीसाठी रितसर अर्ज करून कोटेशनही भरल्यानंतर शेतकऱ्याला वीज जोडणी तर मिळाली नाहीच, उलट त्या शेतकऱ्यांना वीज वापरापोटी ९९६० रुपयांचे देयक आकारण्याचा प्रकार महावितरणने केला आहे.

Electricity payment without agricultural pumps connection | कृषीपंप जोडणीविनाच आकारले वीज देयक

कृषीपंप जोडणीविनाच आकारले वीज देयक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
देपूळ (वाशिम ): शेतामध्ये कूपनलिका खोदून महावितरणकडे २०१५ ला वीजजोडणीसाठी रितसर अर्ज करून कोटेशनही भरल्यानंतर शेतकऱ्याला वीज जोडणी तर मिळाली नाहीच, उलट त्या शेतकऱ्यांना वीज वापरापोटी ९९६० रुपयांचे देयक आकारण्याचा प्रकार महावितरणने केला आहे. देपूळ येथील अर्जदार शेतकरी शंकर डिगांबर गंगावणे महावितरणच्या या प्रकारामुळे अवाक झाले आहेत. 
देपूळ येथील शंकर डिगांबर गंगावणे यांनी २०१५ ला आपल्या शेतात कूपनलिका खोदली आणि या कूपनलिकेच्या आधारे सिंचन करण्यासाठी महावितरणच्या वाशिम उपविभागीय कार्यालयाकडे २०१५ ला ६२०० रुपये कोटेशन भरले. त्यांना काजळांबा शिवारात वीज पुरवठा हवा होता; परंतु गत तीन वर्षापासून त्यांना वीज जोडणी मिळाली नाही. उलट महावितरण कंपनीकडून ३२८९६०००२३६ या ग्राहक क्रमांकानुसार ९९६० रुपयांचे देयकच पाठविले. या प्रकारामुळे शंकर गंगावणे अवाक झाले आणि त्यांनी २२ जानेवारी रोजी याबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे तक्रार करून या प्रकाराची चौकशी करण्यासह तात्काळ वीज जोडणी देण्याची मागणी केली आहे. 


 मंगरुळपीर तालुक्यातही घडला होता असा प्रकार
वाशिम तालुक्यातील देपूळ येथील शेतकºयाला कृषीपंप जोडणीपूर्वीच वीज देयक देण्याचा जो प्रकार घडल असाच प्रकार गतवर्षी मंगरुळपीर उपविभागांतर्गत घडला होता. मंगरुळपीर तालुक्यातही एका शेतकºयाला वीज जोडणी देण्यापूर्वीच त्याच्या नावे वीज देयक आकारण्याचा प्रकार महावितरणकडून करण्यात आला होता. वारंवार घडणाºया या प्रकारामुळे महावितरणच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे शेतकरी मात्र चांगलेच संभ्रमात पडले आहेत. 

  वीज जोडणी न देताच शेतकºयाला वीजदेयक आकारण्याचा प्रकार, ही गंभीर बाब आहे. वाशिम उपविभागीय अभियंत्यांकडून यची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.  .
- व्ही.बी. बेथारिया
कार्यकारी अभियंता, महावितरण

Web Title: Electricity payment without agricultural pumps connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.