ग्रामीण भागातील विद्युत रोहीत्र पडले उघडे
By admin | Published: May 19, 2017 07:28 PM2017-05-19T19:28:10+5:302017-05-19T19:28:10+5:30
मानोरा : तालुक्यातील कार्लीसह अनेक गाव व शेत शिवारातील विद्युत रोहीत्र उघडे पडल्याने त्याची स्थिती भयावह झाली असुन त्यामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मानोरा : तालुक्यातील कार्लीसह अनेक गाव व शेत शिवारातील विद्युत रोहीत्र उघडे पडल्याने त्याची स्थिती भयावह झाली असुन त्यामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विज वितरण कंपनीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.
तालुक्यातील कार्ली गाव शेजारी असलेल्या विद्युत रोहीत्रेच बेहाल झाले असुन अस्तित्वात असलेल्या पेटीचे झाकण गायब आहे तसेच पेटीत असणारे विद्युत साहित्यही वर्षभरापासून बदलले न गेल्यामुळे विद्युत पुरवठा चालु बंद रात्री बे रात्री होण्याच्या वेळेत वाढ झाली आहे. यासह मानोरा तालुक्यातील विद्युत रोहीत्राची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे या जीवघेणा विद्युत रोहीत्राला विज वितरण कंपनीने साहित्य पुरवावे असे अनेक वेळा गावाच्या ग्रामपंचायतकडून लेखी तक्रार देवुन मागणी केली जाते. अनेक गावात विद्युत रोहीत्र आहे, मात्र कमी दाबाचे विद्युत रोहीत्र वीज वितरण कंपनीने बसविल्यामुळे ओव्हरलोडमुळे वीज पुरवठा खंडीत होतो. विज वितरण कंपनीने नियुक्त केलेले विद्युत सेवक हे मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामीण भागात हा प्रकार नेहमीच घडतात.