विजेच्या लंपडावाने कामरगावासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 03:37 PM2018-06-30T15:37:49+5:302018-06-30T15:39:13+5:30

मागील कित्येक दिवसांपासून विजेच्या लंपडावाने कामरगाव वासी त्रस्त असून ग्रामस्थांवर रात्र अंधारात काढण्याची वेळ आली आहे.

electricity suply disrupt in kamargaon | विजेच्या लंपडावाने कामरगावासी त्रस्त

विजेच्या लंपडावाने कामरगावासी त्रस्त

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यप्रवाह विजेच्या कडकडाने वारंवार रात्रअपरात्री खंडीत होत असून कामरगाव सह सर्वच खेडी अंधारात राहत आहे.वारंवार विज पुरवठा खंडीत होत असल्याने कामरगाववासी व  परिसरातील जनता त्रस्त झाली आहे. 


कामरगाव : येथे ३३ केव्ही उपकेंद्र असून याचा पुरवठा कारंजा वरून आहे तसेच हा मुख्यपुरवठा शहराच्या जंगलामधून असून भडशिवणी सबस्टेशनवरून कामरगाव केंद्राला करण्यात येते. पंरतु मागील कित्येक दिवसांपासून विजेच्या लंपडावाने कामरगाव वासी त्रस्त असून ग्रामस्थांवर रात्र अंधारात काढण्याची वेळ आली आहे.
या उपकेंद्राला कामरगाव जवळील सर्व खेडी जोडली आहे,  तसेच डोंगरगाव पासून तर पलाना  पर्यंत सर्वच खेडी जोडली आहेत. मुख्यप्रवाह विजेच्या कडकडाने वारंवार रात्रअपरात्री खंडीत होत असून कामरगाव सह सर्वच खेडी अंधारात राहत आहे . तसेच बिघाड झाल्यास कर्मचारी रात्री बिघाड काढण्यासाठी जात नाही त्यामुळे एकवेळ खंडीत झालेला विद्युत पुरवठा  केंव्हा परत सुरु होईल, याची शाश्वती नसून वारंवार विज पुरवठा खंडीत होत असल्याने कामरगाववासी व  परिसरातील जनता त्रस्त झाली आहे. 
पर्यायी व्यवस्था करावी 
कारंजावरून होणारा विद्युत पुरवठा करणारे साहीत्य निकृष्ठ दर्जाचे आहे. विद्युत लाईन जंगलातून आली असून  वारंवार त्याचठिकाणी समस्या निर्माण होत असतांना पर्यायी व्यवस्था नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत.  पर्यायी व्यवस्था म्हणून दुसºया सब स्टेशनवरून कामरगाव येथे जोडणी करण्यात  यावी अशी मागणी कामरगाववासी करीत आहे. 
वृद्धांना व लहानमुलांना याचा जास्त त्रास होत असून  आहे. तरी यासर्व बाबीकडे लक्ष देवून कामरगावला पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी कामरगाव वासीयांनी केली आहे.

Web Title: electricity suply disrupt in kamargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.