वाशिम जिल्ह्यातील तीन हजारांवर ग्राहकांचा विद्यूत पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 01:21 PM2020-02-23T13:21:43+5:302020-02-23T13:22:25+5:30
५० हजारांपेक्षा अधिक ग्राहकांकडे १२ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक विद्यूत ग्राहकांकडे १८ कोटींची थकबाकी आहे. सदर रक्कम ‘मार्च एन्डींग’पूर्वी वसूल करण्याचे वरिष्ठ स्तरावरून फर्मान सुटले आहे. त्यानुसार, जिल्ह्यात महावितरणनची टीम कामाला लागली असून धडक कारवाईची मोहीम हाती घेऊन देयक थकविणाऱ्या सुमारे तीन हजार ग्राहकांचा विद्यूत पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी शनिवार, २२ फेब्रूवारी रोजी दिली.
जिल्ह्यात घरगुती विज वापर करणाºया ग्राहकांची संख्या १ लाख ८० हजार असून त्यापैकी ५० हजारांपेक्षा अधिक ग्राहकांकडे १२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यासह वाणिज्यिक स्वरूपात वीज वापर करणाºया ग्राहकांकडे ४.१४ कोटी रुपये, औद्योगिक स्वरूपात वीज वापर करणाºया ग्राहकांकडे १.८६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही रक्कम वसूल करित असताना महावितरणची दमछाक होत असून वारंवार पाठपुरावा करूनही ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अखेर कठोर पावले उचलत कारवाईचा धडाका अवलंबिण्यात आला आहे. त्यानुसार, अधिक थकबाकी असलेल्या ३ हजारांपेक्षा अधिक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. जे लाईनमन थकबाकी वसूलीकडे दुर्लक्ष करित आहेत, त्यांच्यावरही कारवाई केली जात असल्याची माहिती कार्यकारी अभियंता तायडे यांनी दिली.
पाणीपुरवठा योजनांचा विजपुरवठाही होणार खंडित
जिल्ह्यातील ४९१ पैकी ४४३ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांना महावितरणकडून वीज पुरविली जाते. त्यातील २५८ ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा योजनेचे विद्यूत देयक अदा केलेले नाही. प्रलंबित असलेली विद्यूत देयकांची रक्कम मार्च २०१९ पुर्वी अदा न केल्यास पाणीपुरवठा योजनांचा विजपुरवठाही खंडित केला जाईल, असे महावितरणचे कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी सांगितले.
वाढतच चाललेल्या विद्यूत थकबाकीमुळे महावितरण आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले आहे. ही बाब लक्षात घेवून थकबाकीदार ग्राहकांवर थेट कारवाईची मोहिम अवलंबिण्यात आली. याकामी दिरंगाई करणाºया महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही ताकीद देण्यात आली आहे. वसूलीकडे दुर्लक्ष करणाºया कर्मचाºयांवरही कारवाई होणार आहे.
- आर.जी. तायडे
कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम