बारा गावांचा वीजपुरवठा प्रभावित
By admin | Published: November 22, 2015 02:00 AM2015-11-22T02:00:26+5:302015-11-22T02:00:26+5:30
दोन वर्षांंपासून कु-हा येथील ३३ के व्ही वीज उपकेंद्राचा प्रश्न प्रलंबित.
विवेकानंद ठाकरे / रिसोड (जि. वाशिम): तालुक्यातील कुर्हा येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्राचा प्रस्ताव तब्बल दोन वर्षापासून मंजूर असूनसुद्धा प्रलंबित आहे. यामुळे १२ गावाचा विद्युत समस्येबाबत प्रश्न कायम आहे. जिल्ह्यात वीज ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र त्या तुलनेत उपकेंद्र व रोहित्रांमध्ये वाढ करण्यात येत नाही. परिणामी, काही उपकेंद्रांवर अधिक भार येत असल्याने नागरिकांना भारनियमनाचा सामना करावा लागतो. विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर वसलेल्या १२ गावांचा विद्युत पुरवठय़ाचा प्रश्न बर्याच दिवसांपासून रेंगाळात आहे. गावामध्ये विद्युत आहे; मात्र विद्युत दाब कमी प्रमाणात आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा असल्याचा कोणताच फायदा होत नाही. यासंदर्भात माजी मंत्री सुभाष झनक यांनी विशेष प्रयत्न करुन ग्राम कुर्हा येथे ३३ केव्हीचे उपकेंद्र १६ ऑगस्ट २0१३ रोजी मंजूर केले होते. महावितरण मुख्यअभियंता एस.पी. नागटिळक यांच्या स्वाक्षरीने मंजुरीचे पत्र देण्यात आले होते. सदर काम प्रस्तावित आराखडा २ अंतर्गत मौजे कुर्हा ता.रिसोड येथील ३३/११ केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचा समावेश केलेला आहे. सदर प्रस्तावाचा समावेश करण्याला दोन वर्षे पुर्ण होवूनही प्रत्यक्षात कामाला मात्र सुरुवात झाली नाही. याबाबत महावितरणने २ एकर शेती खरेदी केली आहे. शेती खरेदी केल्यानंतरही १ वर्षापासून कामाच्या मुहरूत मिळाला नाही. ग्रामीणभागामध्ये शेतीकरिता विद्युत समस्या बिकट बनली असून, नागरिकांना तासनतास भारनिमनाचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात अधिक्षक अभियंता व अभियंता विद्युत कंपनी र्मया. रिसोडचे सि.एम. पाठक यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही.