मानोरा तालुक्यात महावितरणची वीज चोरांवर धडक कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 06:59 PM2018-05-19T18:59:30+5:302018-05-19T18:59:30+5:30
मानोरा (वाशिम) : वीज वाहिन्यांवर आकोडे टाकण्यासह अन्य मार्गाने वीज चोरी करणाºयांवर महावितरणने धडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.
मानोरा (वाशिम) : वीज वाहिन्यांवर आकोडे टाकण्यासह अन्य मार्गाने वीज चोरी करणाºयांवर महावितरणने धडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. याअंतर्गत भरारी पथक नेमून गेल्या तीन दिवसांत झालेल्या कारवाईत तीन लाख रुपये दंड ठोठावण्यात आल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता वी.रा.जामकर यांनी शनिवारी दिली.
महावितरणच्या कारवाईत कारखेडा येथील वीज चोरी करताना पकडण्यात आलेल्या चार ग्राहकांसह साखरडोह रोहणा येथील येथे दहा, दापुरा, अजनी व उंबर्डा येथे चार, हातना वडगाव येथे पाच जणांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, महावितरणच्या विशेष पथकाचे वाहन गावशिवारात दाखल होताच वीज चोरट्यांची मोठी तारांबळ उडत असून वीज चोरट्यांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. या धडक कारवाई मोहिमेत उपकार्यकारी अभियंता जामकर यांच्यासह सहायक अभियंता आर.आर. श्रीराम, जे.एस. दामोदर, आशिष कुंभारे, जी.आर. साबळे, मोरेश्वर चव्हाण, मंगेश शेगावकर आदिंचा समावेश आहे.
४८ तासात दंड न भरल्यास फौजदारी कारवाई- जामकर
प्रत्येक गावात जावून वीज चोºया पकडणे सुरू आहे. ही मोहिम यापुढे अधिक तीव्र केली जाणार असून ४८ तासात दंडाची रक्कम न भरल्यास संबंधित वीज चोरांवर कायदेशीर कारवाई करून फौजदारी दाखल केली जाईल.
- वी.रा. जामकर, उपकार्यकारी अभियंता, मानोरा