घोटा येथील विद्युत रोहित्र जमिनदोस्त; वीजपुरवठा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 03:21 PM2019-07-07T15:21:02+5:302019-07-07T15:21:22+5:30

रिसोड (वाशिम) : वादळवाºयामुळे घोटा गावानजीक असलेले विद्युत रोहित्र खांबासह जमिनदोस्त झाल्याची घटना ६ जुलैला सायंकाळच्या सुमारास घडली.

Electricity transfer collapsed; Disruption of power supply | घोटा येथील विद्युत रोहित्र जमिनदोस्त; वीजपुरवठा खंडीत

घोटा येथील विद्युत रोहित्र जमिनदोस्त; वीजपुरवठा खंडीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : वादळवाºयामुळे घोटा गावानजीक असलेले विद्युत रोहित्र खांबासह जमिनदोस्त झाल्याची घटना ६ जुलैला सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहाणी नसून, घोटा येथील वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, ६ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील घोटा परिसरात सोसाट्याचा वारा सुटला होता. या वादळवाºयामुळे गावानजीक असलेले विद्युत रोहित्र खांबासह जमिनदोस्त झाले. सुदैवाने रोहित्राच्या आसपास कुणी नसल्याने अनर्थ घडला नाही. विद्युत रोहित्र जमिनदोस्त झाल्यामुळे घोटा येथील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. ७ जुलै रोजी दुपारपर्यंतही वीजपुरवठा पूर्ववत झाला नसल्याने गावकरी अंधारात आहेत. या घटनेची माहिती महावितरणच्या संबंधित अभियंत्यांना देण्यायत आली असून, महावितरणची चमू घटनास्थळी दाखल झाली आहे. विद्युत रोहित्राची दुरूस्ती तसेच वीजपुरवठा पूर्ववत करण्याची कार्यवाही युद्धस्तरावर सुरू आहे.

Web Title: Electricity transfer collapsed; Disruption of power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.