‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’: वाशिम जिल्ह्यात घंटानाद जन आंदोलन, प्रतिकात्मक ‘ईव्हीएम’ची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 05:20 PM2019-06-17T17:20:15+5:302019-06-17T17:21:19+5:30

वाशिम: भारिप बहुजन महासंघ महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय येथे ‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’ अंतर्गत घंटानाद जन आंदोलन करण्यात आले.

'Elevate EVMs, save the country': Ghantanad mass movement in Washim district, symbolic 'EVM' Holi | ‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’: वाशिम जिल्ह्यात घंटानाद जन आंदोलन, प्रतिकात्मक ‘ईव्हीएम’ची होळी

‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’: वाशिम जिल्ह्यात घंटानाद जन आंदोलन, प्रतिकात्मक ‘ईव्हीएम’ची होळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम: भारिप बहुजन महासंघ महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय येथे ‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’ अंतर्गत घंटानाद जन आंदोलन करण्यात आले. यात भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश महासचिव तथा वाशिम जिल्हाध्यक्ष मो. युसूफ पुंजानी यांच्या नेतृत्वाखाली १७ जून रोजी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात घंटानाद आंदोलन करण्यात आले.
सध्या देशभरात विरोधक ईव्हीएम मशिनच्या मुद्यावरून सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आवाज उठवत आहेत. या अंतर्गत वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, तसेच जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’च्या घोषणा देत प्रतिकात्मकम ईव्हीएम मशिनची होळी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकाºयांमार्फत निवडणूक आयोगाला निवेदन पाठविण्यात आले. निवेदनावर असे नमूद आहे की, येणाºया विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका या बॅलेट पेपरनेच झाल्या पाहिजे. आंदोलनात जिल्हामहासचिव डॉ.नरेश इंगळे, वाशिम तालुकाध्यक्ष अ‍ॅड.गुळदे, कारंजा तालुकाध्यक्ष भारत भगत,मानोरा तालुकाध्यक्ष तुषार भगत, मंगरूळपीर तालुकाध्यक्ष शंकर तायडे, रिसोड तालुकाध्यक्ष केशव सभादिंडे, मालेगाव तालुकाध्यक्ष संदीप सावळे, कारंजा नगराध्यक्ष शेषराव ढोके, युवक तालुकाध्यक्ष सचिन खांडेकर, जि.प.सदस्य मोहन महाराज राठोड, राजाभाऊ चव्हाण, ज्येष्ठ नगरसेवक एम.टी.खान, भारिप गटनेता फिरोज शेकूवाले, बांधकाम सभापती जावेदोद्दीन, नियोजन सभापती सलीम गारवे, सैय्यद मुजाहिद, निसार खान, अ.एजाज अ. मन्नान,युनूस पहेलवान, चाँद शाह, जाकीर शेख, रशीद भाई,जाकीर अली, सलीम प्यारेवाले, आरिफ मौलाना, राजू इंगोले,रऊफ खान, उस्मान खान, देवराव कटके, शेषराव चव्हाण, दिपक वानखडे, देवानंद कांबळे, बबन वानखडे, गणेश डोंगरे, समाधान सिरसाठ, शंकर कटके, हंसराज काजळे, भिमराव कटके, गौरव जामनीक, रवी भुसारे, शिवलिंगआप्पा राऊत, प्रभाकर सोमकुंवर, दिलीप राऊळ, विठ्ठल लाड, किशोर उके आदींसह पक्षांचे नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: 'Elevate EVMs, save the country': Ghantanad mass movement in Washim district, symbolic 'EVM' Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.