कारखेड्यात दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार, ठाणेदारांकडून कारवाइचे आश्वासन
By संतोष वानखडे | Published: September 18, 2023 03:34 PM2023-09-18T15:34:10+5:302023-09-18T15:34:29+5:30
२८ ऑगस्टला कारखेडा येथे ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव झालाय पारीत
संतोष वानखडे, वाशिम: मानोरा तालुक्यातील कारखेडा येथे गावठी, अवैध दारूबंदीसाठी महिलांनी एल्गार पुकारला असून, सोमवारी (दि.१८) गावातील श्री शंकरगीरी महाराज सभागृहात महिलांनी ठाणेदार प्रविण शिंदे यांना दारूबंदीसाठी साकडे घातले.
२८ ऑगस्ट रोजी कारखेडा येथे ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव पारीत झाला. त्याची अंमलबजावणी म्हणुन गावच्या सरपंचा सोनाली बबनराव देशमुख, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, पोलीस पाटील वासुदेव सोनोने यांनी एक निवेदन ठाणेदार प्रविण शिंदे यांना देऊन महिलांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी कारखेडच्या श्री शंकरगीरी सभागृहात मार्गदर्शन करण्याकरीता आमंत्रित केले होते. यावेळी महीलांनी कूटूंब प्रमुख व्यसनाधीन झाल्यामुळे संसाराचा गाडा कसा हाकलायचा असे प्रश्न उपस्थित केले.
ठाणेदारांकडून कारवाइचे आश्वासन
कारखेडा येथील अवैध दारूविक्री व्यवसाय करणाऱ्यांवर तातडीने कार्यवाही केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नाही, असे आश्वासन मानोरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रविण शिंदे यांनी दिले.