ठेकेदाराकडून होणारा त्रास दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:37+5:302021-07-01T04:27:37+5:30

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या १५ वर्षांपासून ठरावीक ठेकेदारामार्फत वाशिम नगर परिषदेला कुशल व अकुशल मनुष्यबळ पुरविण्यात ...

Eliminate trouble from the contractor | ठेकेदाराकडून होणारा त्रास दूर करा

ठेकेदाराकडून होणारा त्रास दूर करा

Next

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या १५ वर्षांपासून ठरावीक ठेकेदारामार्फत वाशिम नगर परिषदेला कुशल व अकुशल मनुष्यबळ पुरविण्यात येते. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ठेकेदाराने आतापर्यंत फारशी वाढ होऊ दिलेली नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून इपीएफच्या नावाखाली रक्कम कपात केली जाते. प्रत्यक्षात मात्र ती भरली जात नाही. तक्रार केल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. वेतनापासून ५ ते ६ महिने वंचित ठेवण्यात येते. यामुळे महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना कुटुंबाचे पालनपोषण करणे अवघड झाले आहे. ठेकेदाराच्या मुजोरीला कंटाळून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले.

...................

कोट :

मी जानेवारी २०२१ पासून कंत्राट घेतले आहे. त्यापूर्वीच्या ठेकेदाराने कर्मचाऱ्यांची इपीएफ रक्कम भरली नव्हती. त्यामुळेच पगारास विलंब होत आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांचे पगार बाकी आहेत. जे काम न करता पगार मागतात, त्यांना कामावरून कमी करण्याची तंबी द्यावीच लागते.

- सुनील जाधव

मजूर ठेकेदार, वाशिम

Web Title: Eliminate trouble from the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.