५६ हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमणाचे निर्मूलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:21 AM2020-06-10T11:21:05+5:302020-06-10T11:21:10+5:30

मसला खु. गावातील ५६ हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण निर्मुलन वाशिम वनविभागाने सुरू केले आहे

Elimination of encroachment on 56 hectares of forest land | ५६ हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमणाचे निर्मूलन

५६ हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमणाचे निर्मूलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये शासनाच्या अधिसूचनेनुसार वनक्षेत्र म्हणून घोषित झालेल्या ४५० हेक्टर जमीनीवर काही लोकांनी अतीक्रमण केले असून अनेकांनी चालू हंगामातही खरीपाच्या पिकांची त्यावर पेरणी केली आहे. हे अतीक्रमण हटविण्याकामी झालेले प्रशासकीय प्रयत्न पूर्णत: निष्फळ ठरत होते. त्यामुळे शासनाच्या मूळ उद्देश असफल ठरत होता. आता हे अतिक्रमण हटविण्यात येत असून, मालेगाव तालुक्यातील मसला खु. गावातील ५६ हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण निर्मुलन वाशिम वनविभागाने सुरू केले आहे. या प्रकरणी पोलिस विभागाचे सहकार्य मिळत आहे.
वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये शासनाच्या अधिसूचनेनुसार वनक्षेत्र म्हणून घोषित झालेल्या ४५० हेक्टर जमीनीवर काही लोकांनी अतीक्रमण केले असून अनेकांनी चालू हंगामातही खरीपाच्या पिकांची त्यावर पेरणी केली आहे. जिल्ह्यात वाशिम वनविभागांतर्गत वाशिम, कारंजा, मानोरा आणि मालेगाव असे चार वनपरिक्षेत्र असून, ४१ हजार ९७१.६६ हेक्टर जमिनीवर वनक्षेत्राचा विस्तार झालेला आहे. दरम्यान, शासनस्तरावरून राबविण्यात येणाऱ्या मोहिमेंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हावी, या उद्देशाने राखीव वनक्षेत्र घोषित करण्याच्या अधिसूचनेनुसार महसूल विभागाकडून ४७९४.१४ हेक्टर ई-क्लास जमीन वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली. त्यापैकी काही क्षेत्रातील जमिनीवर संबंधित त्या-त्या गावातील तसेच आसपासच्या काही लोकांनी अतिक्रमण करून जमीन वहितीखाली आणली आहे.


शासनाच्या ‘अ‍ॅक्शन प्लान’नुसार कारवाई
वनजमिनीवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यासाठी राज्यशासनाने अ‍ॅक्शन प्लान तयार केला आहे. यासाठी ‘गूगल अर्थ’चा आधार घेण्यात आला असून, वनविभागाकडे वनजमिनीवर असलेल्या अतिक्रमणाची नोंदीची पडताळणी करून कार्यवाही करण्यात येत आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९७३ अंतर्गत वनजमिनीवरील अतिक्रमणावर कारवाईचे अधिकार असून, नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार आता वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यासाठीच अ‍ॅक्शन प्लान तयार करण्यात आला आहे. याच अ‍ॅक्शन प्लाननुसार जिल्ह्यातील वनजमिनीवरचे अतिक्रमण हटविण्यात येत आहे.

 

Web Title: Elimination of encroachment on 56 hectares of forest land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.