मालेगावात थरारक प्रात्यक्षिकातून अंधश्रद्धा निर्मुलनाबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 02:18 PM2017-11-21T14:18:35+5:302017-11-21T14:19:27+5:30
मालेगाव: जिभेत त्रिशुल टोचणे, भूत भानामातीचे झटके, आदिसारंखी थरारक प्रात्यक्षिके सादर करून अंधश्रद्धा निमुर्लनाबाबत प्रभावी मार्गदर्शन मालेगाव पोलीस स्टेशनच्या प्रांगणात करण्यात आले.
मालेगाव: जिभेत त्रिशुल टोचणे, भूत भानामातीचे झटके, आदिसारंखी थरारक प्रात्यक्षिके सादर करून अंधश्रद्धा निमुर्लनाबाबत प्रभावी मार्गदर्शन मालेगाव पोलीस स्टेशनच्या प्रांगणात करण्यात आले. संत गाडगेबाबा राज्यस्तरीय प्रबोधन यात्रेचे आयोजन श्रीकृष्ण धोटे यांनी ही थरारक प्रात्यक्षिके करून उपस्थिताना मार्गदर्शन केले.
संतगाडगेबाबा राज्यस्तरीय प्रबोधन यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील जनतेला अंधश्रद्धा आणि बुवाबाजीबाबत मार्गदर्शन करून जनजागृती केली जात आहे. ही यात्रा मंगळवारी मालेगाव येथे पोहोचल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निमुर्लनाबाबत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी श्रीकृ ष्ण धोटे यांनी जिभेत त्रिशुल किंवा लोखंडी तार टोचून लोकांची दिशाभूल कशी केली जाते. भूत लागले, भानामती झाल्यानंतर क ाय होते आणि हे प्रकार किती खोटे आहेत. ते प्रत्यक्ष थरारक प्रात्यक्षिकाद्वारे दाखविले. यावेळी ठाणेदार सुरेश नाईकनवरे, पोलीस उपनिरीक्षक जमधाडे, संजय गवई यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि अनेक नागरिकांचीही उपस्थिती होती.