शेतक-यांना आत्महत्येच्या दुष्टचक्रातून बाहेर काढा!
By admin | Published: October 7, 2015 02:19 AM2015-10-07T02:19:27+5:302015-10-07T02:19:27+5:30
प्रशासनाच्या प्रामाणिक प्रयत्नांची गरज असल्याचे किशोर तिवारी यांचे प्रतिपादन.
वाशिम : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकर्यांना आत्महत्येच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनामधील प्रत्येक अधिकारी व कर्मचार्याने प्रामाणिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या जिजाऊ सभागृहात आयोजित अन्नदाता प्रबोधन संकल्पच्या सभेमध्ये तिवारी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, आरोग्य विभागाचे डॉ. अविनाश लव्हाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. शरद जावळे, संदिपान सानप, तहसीलदार आशिष बिजवल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक शेलूकर, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जय शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक ए. जी. वाघमारे, कृषी विकास अधिकारी अभिजित देवगिरीकर यांच्यासह जिल्ह्यातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, पोलीस पाटील आदी उपस्थित होते.