निधीचा अपहार; जवळा येथील ग्रामसेवक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 07:11 PM2021-06-29T19:11:34+5:302021-06-29T19:11:45+5:30

Gramsevak suspended : मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी रिसोड तालुक्यातील जवळा येथील ग्रामसेवकाला निलंबित केले आहे.

Embezzlement of funds; Gramsevak suspended | निधीचा अपहार; जवळा येथील ग्रामसेवक निलंबित

निधीचा अपहार; जवळा येथील ग्रामसेवक निलंबित

Next

रिसोड : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये अपहार, कर्तव्यात कसुर, वरिष्टांच्या आदेशाची अवहेलना करणे आदी ठपका ठेवत मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी रिसोड तालुक्यातील जवळा येथील ग्रामसेवकाला निलंबित केले आहे. आर.पी.गोटे असे निलंबित ग्रामसेवकाचे नाव आहे.
जवळा येथे ग्रामसेवकाच्या कारभारासंदर्भात संतोष राठोड यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. आर.पी.गोटे यांनी सरपंच व काही सदस्यांना हाताशी धरून पंधराव्या वित्त आयोगाचे निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अपहार केला, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन नाही, नियमाची पायमल्ली आदी मुद्दे उपस्थित करून चौकशी करावी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा राठोड यांनी दिला होता. याबाबत लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची चौकशी केल्यानंतर दोषी आढळून आल्याने अखेर गोटे यांना निलंबित करण्यात आले. डिजिटल स्वाक्षरीमुळे एकाही ग्रामपंचायतने १५ व्या वित्त आयोगाचे पैसे काढले नाही. तशी शासनाची परवानगी नाही. तरिही पैसे काढले आणि वाटुन घेतले. त्यामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल करुन खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी राठोड यांनी केली. यापूर्वीही लोनकर, अंभोरे, विर असे तीन ग्रामसेवक जवळा ग्रामपंचायतमध्ये असताना निलंबित झाले होते, हे विशेष.

Web Title: Embezzlement of funds; Gramsevak suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.