आंब्यासाठी केवळ तीन मंडळांना विम्याचे कवच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:11 AM2017-10-12T01:11:36+5:302017-10-12T01:12:11+5:30

वाशिम : वाशिम जिल्ह्यात आंबिया बहरातील संत्रा, डाळिंब,  आंबा व लिंबू या फळपिकांसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनें तर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना  राबविली जात आहे. दरम्यान जिल्हय़ातील ४६ पैकी केवळ तीन  मंडळांचा आंबा या फळ पिकासाठी समावेश झाल्याने अन्य  मंडळातील शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे.

Emergency insurance cover for only three circles! | आंब्यासाठी केवळ तीन मंडळांना विम्याचे कवच!

आंब्यासाठी केवळ तीन मंडळांना विम्याचे कवच!

Next
ठळक मुद्देएकूण ४६ मंडळ पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम जिल्ह्यात आंबिया बहरातील संत्रा, डाळिंब,  आंबा व लिंबू या फळपिकांसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनें तर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना  राबविली जात आहे. दरम्यान जिल्हय़ातील ४६ पैकी केवळ तीन  मंडळांचा आंबा या फळ पिकासाठी समावेश झाल्याने अन्य  मंडळातील शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे.
फळ पिकांना विम्याचे कवच म्हणून सन २0१७-१८ या वर्षात  पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबविली  जात आहे. या योजनेतून संत्रा, डाळिंब, आंबा व लिंबू या फळ िपकांसाठी जिल्ह्यातील अनेक गावे वगळण्यात आली आहेत.  वाशिम जिल्ह्यात एकूण ४६ महसूल मंडळे आहेत. आंबा या  फळ पिकासाठी केवळ तीन मंडळाचा समावेश आहे. यामध्ये  वाशिम तालुक्यातील केकतउमरा, राजगाव, मानोरा तालुक्या तील मानोरा या महसूल मंडळांचा समावेश आहे. आंबा  िपकासाठी प्रति हेक्टर १ लाख १0 हजार रुपये विमा संरक्षण  मिळणार असून, याकरिता एकूण विमा हप्ता ७७ हजार रुपये  आहे. यापैकी ५ हजार ५00 रुपये विमा हप्ता शेतकर्‍यांनी  भरावयाचा असून, उर्वरित रक्कम शासन भरणार आहे. आंबा  िपकासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर  २0१७ पयर्ंत आहे.
संत्रा फळ पिकासाठी वाशिम तालुक्यातील वाशिम, अनसिंग,  केकतउमरा, पार्डीआसरा, राजगाव, रिसोड तालुक्यातील  रिसोड, केनवड, भरजहांगीर, रिठद, मालेगाव तालुक्यातील  मालेगाव, मुंगळा, करंजी, किन्हीराजा, शिरपूर, चांडस, मेडशी,  मंगरूळपीर तालुक्यातील मंगरूळपीर, शेलूबाजार, पोटी,  कवठळ, धानोरा, पार्डीताड, मानोरा तालुक्यातील मानोरा,  गिरोली, उमरी बु. कुपटा तसेच कारंजा तालुक्यातील उंबर्डा  बाजार, कामरगाव, धनज बु. पोहा, खेर्डा, हिवरा लाहे, येवता  या ३२ महसूल मंडळांचा समावेश विमा योजनेत करण्यात  आला. उर्वरित १४ मंडळे वगळण्यात आली. संत्रा पिकासाठी  विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३0 नोव्हेंबर  २0१७ पयर्ंत आहे.
डाळिंब या फळ पिकासाठी वाशिम तालुक्यातील पार्डीआसरा,  राजगाव, पार्डीटकमोर, नागठाणा, मंगरूळपीर तालुक्यातील  मंगरूळपीर, आसेगाव, शेलूबाजार, कवठळ, धानोरा व पार्डी ताड, मालेगाव तालुक्यातील मुंगळा, मानोरा तालुक्यातील उंबरी  बु. या मंडळांचा समावेश आहे. डाळिंब पिकासाठी विमा योजने त सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपयर्ंत आहे. 

Web Title: Emergency insurance cover for only three circles!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.