काेराेना संसर्ग पाहता नगरपरिषदेतर्फे उपाययाेजनांवर भर - दीपक माेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 10:14 AM2021-03-25T10:14:37+5:302021-03-25T10:14:46+5:30
Lokmat Interview नगरपरिषदेतर्फे नववनविन उपक्रम राबवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
वाशिम : शहरात वाढती काेराेनाची संख्या पाहता नगरपरिषदेतर्फे नववनविन उपक्रम राबवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी दीपक माेरे यांची घेतलेली मुलाखत.
काेराेना संसर्ग राेखण्यासाठी काेणकाेणते उपक्रम राबविण्यात येत आहेत?
- काेराेना संसर्ग पाहता नागरिकांना ध्वनीक्षेपकाव्दारे काेराेना नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन, शहराचे निर्जतुकीकरणावर भर, मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई, व्यापाऱ्यांची काेराेना चाचणीसह काेराेनासंसर्गासंदर्भातील उपाय याेजनांवर भर देण्यात येत आहे.
नगरपरिषदेतर्फे मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करतांना अडचणी येतात का?
- शहरवासियांचे आराेग्य अबाधित रहावे, याचकरिता नगरपरिषद पुढाकार घेऊन फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा, मास्कचा वापर करा, गर्दी टाळा यासह आवाहन करीत आहेत. काही नागरिक याचे उल्लंघन करतांना दंड केला जात आहे. यावेळी काही नागरिक वाद घालत आहेत. पाेलिसांनी सहकार्य केल्यास प्रभावी माेहीम राबविण्यात येईल.
व्यापाऱ्यांची काेराेना चाचणीला कसा प्रतिसाद लाभला?
- नगरपरिषदेतर्फे जे व्यापारी काेराेना चाचणी करुन घेणार नाहीत त्यांना प्रतिष्ठान उघडण्यास मनाई केल्याने व्यापाऱ्यांनी माेठया प्रमाणात चाचणी करुन घेतली. नगरपरिषदेतर्फे सुध्दा व्यापाऱ्यांची काेराेना चाचणीचे कॅम्प आयाेजित केले हाेते.
नागरिकांना काय आवाहन कराल?
काेराेना संसर्ग पाहता नागरिकांनी आपली व आपल्या शहरवासियांच्या आराेग्याची काळजीबाबत खबरदारी घ्यावी. याकरिता काेराेना नियमांचे पालन आवश्यक आहे. ते नागरिकांनी करावे.