पर्यावरण शुध्दी, स्वच्छतेचा संदेश पाेहचविण्यासाठी विविध उपक्रमांवर भर -दिपा वानखडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:16 PM2021-03-10T16:16:44+5:302021-03-10T16:17:06+5:30

Interview पर्यावरण शुध्दी व स्वच्छतेचा संदेश पाेहचिवण्यासाठी आपण विविध उपक्रम राबवित असल्याचे सांगितले.

Emphasis on various initiatives to spread the message of environmental cleanliness and cleanliness - Deepa Wankhade | पर्यावरण शुध्दी, स्वच्छतेचा संदेश पाेहचविण्यासाठी विविध उपक्रमांवर भर -दिपा वानखडे

पर्यावरण शुध्दी, स्वच्छतेचा संदेश पाेहचविण्यासाठी विविध उपक्रमांवर भर -दिपा वानखडे

Next

वाशिम : ऑनलाईन याेग शिबिरातून धडे देत नागरिकांची प्रतिकारक्षमता वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तथा जागतिक पातळीवरील याेग शिक्षक व याेग मूल्यांकन परीक्षा उतीर्ण झालेल्या दिपा वानखडे यांनी राबविलेल्या उपक्रमासंदर्भात लाेकमततर्फे मुलाखत घेतली असता त्यांनी वातावरण, पर्यावरण शुध्दी व स्वच्छतेचा संदेश पाेहचिवण्यासाठी आपण विविध उपक्रम राबवित असल्याचे सांगितले.


प्रश्न : वातावरण, पर्यावरण शुध्दीसाठी नेमका काय उपक्रम राबविला जात आहे.
उत्तर :  पतंजली योग साधना या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपव्दारे दररोज योगा, प्राणायमाचे प्रकाराची माहिती,  त्याचे फायदे ग्रुप सदस्यांना त्यांनी पटवून दिले जातात. वातावरण , पर्यावरण शुध्दीसाठी काय करावे यासंदर्भातही माहिती दिल्या जाते.


प्रश्न : ऑनलाईन याेग शिबीरे घेण्याचे कसे सुचले
उत्तर : संपूर्ण काेराेना काळात सर्वप्रकारचे गर्दी हाेणारे कार्यक्रम बंद हाेते. अशावेळी सर्व जग थांबले असतांना सुचले की, व्हाॅटस अॅप गृपव्दारे नागरिकांकडे याेगाचे महत्व, याेगाचे प्रकार सांगता येऊ शकतात, आणि करुनही दाखविल्या सुध्दा जाऊ शकतात. प्रयाेग करुन पाहिला असता प्रतिसाद मिळाला आणि आजही अविरत सुरु आहे.


प्रश्न : या उपक्रमाकरिता काेणाचे याेगदान लाभले
उत्तर : भारत स्वाभिमान पतंजली योग समिती, वाशिमचे कोषाध्यक्ष  व आजीवन सदस्य पतंजली योगपीठ, हरिव्दारचे डॉ. भगवंतराव वानखडे, संघटनमंत्री शंकर उजळे  व पंतजली परिवाराच्या मार्गदर्शनामुळे त्यांना हे शक्य झाले.


प्रश्न : याेगाबाबत युवक, युवतींना काय सांगाल
उत्तर : रोगप्रतिकारशक्ती वाढावी याकरिता आयुर्वेदाचा आधार घेऊन शरिराचे, इंद्रियाचे, मनाच्या सर्वप्रकारच्या रोग व्याधीपासून रक्षण करणे होय. प्रत्येक युवक, युवतींनी स्वतासाठी, कुटुंबासाठी याेग् करावा. तसेच याेगाचा प्रचार , प्रसार करावा.

Web Title: Emphasis on various initiatives to spread the message of environmental cleanliness and cleanliness - Deepa Wankhade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.