‘वेबिनार’च्या माध्यमातून जलजागृतीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:46 AM2021-07-14T04:46:35+5:302021-07-14T04:46:35+5:30
पावसाच्या पाण्याचे योग्यरीत्या संकलन व्हावे, तसेच पाण्याची गुणवत्ता कायम राहावी, या मूळ उद्देशातून शासनाने ‘कॅच द रेन’ अभियान हाती ...
पावसाच्या पाण्याचे योग्यरीत्या संकलन व्हावे, तसेच पाण्याची गुणवत्ता कायम राहावी, या मूळ उद्देशातून शासनाने ‘कॅच द रेन’ अभियान हाती घेतले. या अंतर्गत १ मार्च, २०२१ पासून पाणी नमुने तपासणी प्रक्रियेस गती देण्यात आली आहे. तेव्हापासून ९ जुलैपर्यंत वाशिम येथील जिल्हा प्रयोगशाळेसह मालेगाव आणि मानोरा येथील उपविभागीय प्रयोगशाळांमध्ये जिल्हाभरातील विविध ठिकाणच्या जलस्रोतांमधील पाण्याचे १,०२३ नमुने तपासण्यात आले. त्यातील रासायनिकचे १५३ आणि जैविकचे १८ असे एकूण १७१ नमुने दुषित आढळून आले, अशी माहिती भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक सुनील कडू यांनी दिली.
...................
जि.प. सीईओ, सहायक जिल्हाधिकाऱ्यांची भेट
वाशिम येथे कार्यान्वित जिल्हा प्रयोगशाळेस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत आणि परीविक्षाधिन सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी भेट देऊन जलजागृती अभियान व प्रयोगशाळेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.