‘पेन्शन दिंडी’त सहभागी होण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील कर्मचारी मुंबईकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 02:02 PM2018-09-30T14:02:09+5:302018-09-30T14:03:10+5:30
वाशिम : सन २००५ नंतरच्या कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने महात्मा गांधी जयंती दिनी शिवनेरी, ठाणे ते मुंबई अशी पेन्शन दिंडी काढली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सन २००५ नंतरच्या कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने महात्मा गांधी जयंती दिनी शिवनेरी, ठाणे ते मुंबई अशी पेन्शन दिंडी काढली जाणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हातील कर्मचारी मुंबईकडे रवाना होत असल्याची माहिती जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकाºयांनी रविवारी दिली.
जूनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी विज्युक्टा व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने यापूर्वी अनेकवेळा विविध टप्प्यात आंदोलने केली आहेत. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २ आॅक्टोबरला मंत्रालयावर पेन्शन दिंडी काढण्यात येणार आहे. पेन्शन दिंडीची दखल घेतली नाही तर ३ आॅक्टोबरला घराव आणि त्यानंतर बेमुदत उपोषण अशी आंदोलनाची पुढील दिशा आहे. पेन्शन दिंडीत जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांसह विविध विभागाचे हजारो कर्मचारी सहभागी होणार आहेत. जूनी पेन्शन योजना लागू नसल्याने कर्मचाºयांवर एकप्रकारे अन्याय असून, हा अन्याय दूर करण्यासाठी २००५ नंतर शासन सेवेत रुजू झालेले कर्मचारी एकवटले आहेत. २००५ नंतर शासन सेवेत रुजू झाल्यानंतर जवळपास तीन हजार कर्मचाºयांचा सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाला. नवीन पेंशन योजनेनुसार मृतक कर्मचाºयाच्या वारसाला आजपर्यंत कोणताच आर्थिक लाभ मिळालेला नाही. शासनाने कर्मचाºयांना दिलासा म्हणून जूनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी महात्मा गांधी जयंतीदिनी २ आॅक्टोबरला मुंबई येथे पेन्शन दिंडी काढली जाणार असून, यामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील हजारो कर्मचारी शिवनेरी, ठाणे, मुंबईकडे रवाना होत असल्याची माहिती राज्य प्रसिद्धी प्रमुख बालाजी मोटे, राज्य समन्वयक विनोद काळबांडे, जिल्हाध्यक्ष नीलेश कानडे, गोपाल लोखंडे, श्रीकांत बोरचाटे, मिलींद इंगळे, मदन चौधरी, सतीश शिंदे, हरीष चौधरी यांनी दिली.