अधिकारी, कर्मचार्यांना वेतनासाठी आधार बंधनकारक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:49 AM2017-09-27T00:49:49+5:302017-09-27T00:50:28+5:30
वाशिम : शासकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या वेतनाकरीता सेवार्थ प्रणाली सुरू केली असून, आता अधिकारी, कर्मचार्यांना या प्रणालीमध्ये आधार क्रमांकाची नोंद करावी लागणार आहे.
Next
ठळक मुद्देशासकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या वेतनाकरीता सेवार्थ प्रणाली सुरू प्रणालीमध्ये आधार क्रमांकाची नोंद करावी लागणार
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या वेतनाकरीता सेवार्थ प्रणाली सुरू केली असून, आता अधिकारी, कर्मचार्यांना या प्रणालीमध्ये आधार क्रमांकाची नोंद करावी लागणार आहे.
सेवार्थ प्रणालीत आधार नोंद झाल्याचे विवरणपत्र सप्टेंबरच्या वे तन देयकासोबत जोडावे लागणार आहे, अशी माहिती जिल्हा कोषागार एस. टी. गाभणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना मंगळवारी दिली.
बहुतांश योजनांसाठी ‘आधार’ क्रमांक अनिवार्य करण्यात आले आहे. याच धर्तीवर कर्मचारी, अधिकार्यांच्या वेतनासाठी शासनाने निर्णय घेतला. अनेक कर्मचार्यांचे आधार लिकींग नसल्याने त्यांची धावपळ सुरु आहे.