शेतकरी कर्जमाफीनंतर महामंडळाच्या कर्जमाफीनेही धरला जोर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 07:48 PM2017-08-01T19:48:24+5:302017-08-01T19:52:57+5:30
वाशिम : महाराष्ट्र शासनाने राज्यभरातील पीक कर्ज थकीत असणा-या शेतक-यांना कर्जमाफी दिली. त्याचप्रकारे दलित, आदिवासी, ओबीसी समाजातील बेरोजगारांकडे थकीत असलेले ६३५.९९ कोटी रुपयांचे कर्ज देखील माफ करावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळांतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे १६२ कोटी, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे २३९ कोटी, चर्मोद्योग महामंडळाचे ६८.७९ कोटी, ओबीसी महामंडळाचे ८५ कोटी, अपंग विकास महामंडळाचे ३७.०६ कोटी, आदिवासी विकास महामंडळाचे ३२ कोटी असे एकंदरित ६३५.९९ कोटी रुपयांचे कर्ज बेरोजगार युवकांकडे थकीत आहे. ते शासनाने माफ करावे, यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती रिपाइंचे वाशिम जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी दिली.