कर्मचाऱ्यांनी बुजविले महामार्गावरील खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:41 AM2021-01-25T04:41:29+5:302021-01-25T04:41:29+5:30

.................. सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन वाशिम : मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २३ जानेवारी रोजी ...

Employees fill potholes on highways | कर्मचाऱ्यांनी बुजविले महामार्गावरील खड्डे

कर्मचाऱ्यांनी बुजविले महामार्गावरील खड्डे

Next

..................

सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

वाशिम : मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २३ जानेवारी रोजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्यावतीने अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एस. कुबडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून संजय गोटे यांची उपस्थिती होती.

...............

प्रशासकीय कार्यालयाकडील रस्त्याची दुरवस्था

वाशिम : अकोला नाका आणि सिव्हील लाईनकडून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था होऊन ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष पुरविण्याची मागणी प्रवीण गोटे यांनी शुक्रवारी केली.

................

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाची तयारी

वाशिम : एका दिवसावर येऊन ठेपलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची तयारी प्रशासकीय कार्यालये आणि शाळा-महाविद्यालय स्तरावर सुरू झाली आहे. यंदा प्रथमच कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम न करता प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे.

....................

शेलूबाजार रस्त्यावर वाहनांची तपासणी

वाशिम : वाशिम येथून शेलूबाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी वाहनांची कसून तपासणी केली. वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर यावेळी कारवाई करताना कर्मचारी दिसून आले.

..............

बसस्थानकातील डांबरीकरण रखडले

वाशिम : स्थानिक बसस्थानकात एस.टी. उभ्या राहतात, त्याठिकाणी डांबरीकरण करण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळाली असून त्यासाठी ४७ लाखांचा निधीसुद्धा मंजूर आहे; मात्र हे काम प्रलंबित असून एस.टी. चालक व प्रवाशांची गैरसोय होत आहे.

.................

तोट्यांअभावी पाण्याचा अपव्यय

वाशिम : जुने शहरातील अनेक ठिकाणच्या नळांना आजही तोट्या लागलेल्या नाहीत. यामुळे पाणी भरल्यानंतर बरेचसे नळ तसेच राहत असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे लक्ष पुरवून नळांना तोट्या लावणे बंधनकारक करावे, अशी मागणी संदीप चिखलकर यांनी न.प.कडे शुक्रवारी केली.

Web Title: Employees fill potholes on highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.