नवीन पेन्शन योजनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:34 PM2018-10-31T12:34:57+5:302018-10-31T12:35:44+5:30
वाशिम : ३१ आॅक्टोबर २००५ रोजी जूनी पेन्शन योजना रद्द करून नवीन अन्शदायी पेन्शन योजना अंमलात आणण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ३१ आॅक्टोबर २००५ रोजी जूनी पेन्शन योजना रद्द करून नवीन अन्शदायी पेन्शन योजना अंमलात आणण्यात आली. वित्त विभागाच्या या अधिसूचनेचा निषेध म्हणून आणि जून्या पेन्शन योजनेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३१ आॅक्टोबर रोजी शिक्षक महासंघासह विविध संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.
३१ आॅक्टोबर २००५ नंतर शासन सेवेत रूजू झालेल्या कर्मचाºयांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे. या नवीन पेन्शन योजनेला सर्वच स्तरातून विरोध असून, जूनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी शिक्षक महासंघासह विविध संघटनांनी शासनस्तरावर केली आहे. मध्यंतरी ‘पेन्शन दिंडी’ही काढण्यात आली होती. तथापि, अद्यापही जूनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात कोणत्याही ठोस हालचाली नाहीत. राज्याच्या वित्त विभागाने काढलेल्या नवीन अंशदायी पेन्शन योजनेच्या अधिसूचनेला ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी १३ वर्षे होत आहेत. या अधिसूचनेचा निषेध म्हणून राज्यभरात निषेध मोर्चा, धरणे आंदोलन, काळ्या फिती लावून कामकाज आदी स्वरुपात आंदोलनाची हाक देण्यात आली. वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेसह खासगी शैक्षणिक संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी जूनी पेन्शन योजना लागू करणे आणि नवीन पेन्शन योजनेला विरोध म्हणून काळ्या फीती लावून कामकाज केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले.