कर्मचाऱ्यांनी नोंदवली सामूहिक बदल्यांची मागणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 06:32 PM2019-03-02T18:32:12+5:302019-03-02T18:32:31+5:30
वाशिम : स्थानिक जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यरत कर्मचाºयांना विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी हिन दर्जाची वागणूक देवून मोठा गोंधळ घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्थानिक जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यरत कर्मचाºयांना विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी हिन दर्जाची वागणूक देवून मोठा गोंधळ घातला. काही कर्मचाºयांना दमदाटी करून मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. १ मार्च रोजी घडलेल्या या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कर्मचाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे २ मार्चला निवेदन सादर करून सामुहिक बदल्यांची मागणी नोंदवली आहे. यामुळे जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली.
यासंदर्भातील निवेदनात कर्मचाºयांनी नमूद केले आहे, की जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचारी आढावा सभेची माहिती तयार करित असताना सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्याठिकाणी येवून जिल्हा परिषद सदस्य गवळी यांनी वरिष्ठ सहायक गणेश झ्याटे यांच्या टेबलवर असलेल्या विविध योजनांतर्गत कामांच्या निविदा नस्ती व टिप्पणी काढून नेण्याच्या प्रयत्न केला. सदर कागदपत्रे तपासणी करून २ मार्चला सकाळी १० वाजता पुरविण्यात येतील, असे त्यांना सांगितले. मात्र, गवळी यांनी कर्मचाºयांना दमदाटी करून शिविगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. घडलेल्या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी भयभीत झाले आहेत. सदर घटनेचे ‘सीसीटीव्ही फुटेज’ देखील उपलब्ध असून याबाबत सखोल तपासणी करून ठोस कार्यवाही करण्यात यावी; अन्यथा सर्व कर्मचाºयांच्या सामूहिक बदल्या कराव्या. याप्रकरणी कार्यवाही न झाल्यास सर्व कर्मचारी कामबंद आंदोलन पुकारतील, असा इशाराही संबंधित कर्मचाºयांनी दिला आहे. निवेदनावर बांधकाम विभागातील कर्मचारी डी.जी. देशमुख, बी.आर. राजस, जी.आर. इंगोले, बी.डी. गवळी, आर.जी. भारती, एस.एच. बनसोड, पी.एस. बेलोकार, जी.यू. झ्याटे, आर.डी. भेजगे, वी.म. मिसाळ, जी.बी. मोडकर, गजानन भुतकर, एच.के. वाघ आदिंच्या स्वाक्षºया आहेत.