सुटीच्या दिवशीही कर विभागातील कर्मचारी कर्तव्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 01:07 PM2019-03-09T13:07:55+5:302019-03-09T13:08:40+5:30

मार्च अखेरपर्यंत शंभर टकके करवसुलीसाठी नगरपरिषदेचा कर विभाग सरसावला असून सुटीच्यादिवशीही कर्मचारी कर्तव्य बजावतांना दिसून येत आहे.

Employees' of tax department on duty on holidays | सुटीच्या दिवशीही कर विभागातील कर्मचारी कर्तव्यावर

सुटीच्या दिवशीही कर विभागातील कर्मचारी कर्तव्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते. मार्च अखेरपर्यंत शंभर टकके करवसुलीसाठी नगरपरिषदेचा कर विभाग सरसावला असून सुटीच्यादिवशीही कर्मचारी कर्तव्य बजावतांना दिसून येत आहे. शनिवार ९ मार्च रोजी सुटी असताना कर विभागातील कर्मचारी कराचा भरणा करुन घेण्यासाठी कार्यालयात हजर दिसून आलेत. विशेष म्हणजे ३१ मार्चपर्यंत रात्री उशिरापर्यंत कार्यालय सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हयातील चारही नगरपालिकांमध्ये सर्वाधिक कर वसुली करण्याचे कार्य दरवर्षी वाशिम नगरपरिषदेच्यावतिने करण्यात येते. याहीवर्षी १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी केल्याने कर विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी पुढाकार घेतला आहे. ज्या नागरिकांकडे कर थकीत आहे त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे सुतोवाच नगरपरिषद मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी केल्याने कराचा भरणा करण्यासाठी नागरिक पुढाकार घेतांना दिसून येत आहेत. नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी सुध्दा शहर विकासाच्या दृष्टीने कराचा भरणा करणे आवश्यक असल्याने नागरिकांनी या मोहीमेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 
 वाशिम नगरपरिषदेची करवसुली १०० टक्के करण्यासाठी  मुख्याधिकारी वसंत इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली करनिरिक्षक अ.अजिज अ. सत्तार, एस.एम. उगले, करसंग्राहक एस.एल. किरळकर, एस. ए. इंगळे, डी.एल. देशपांडे, एस.एस. काष्टे, आर.एच. बेनीवाले, के.आर हडपकर, एन.के. मुल्ला, के.डी. कनोजे, एस.एल. खान, अ.वहाब शे. चाँद परिश्रम घेत आहे.
 
शहराच्या विकासासाठी कराचा भरणा करणे आवश्यक आहे. सर्व नागरिकांना पुरविण्यात येणाºया सुविधा मिळाव्यात यासाठी कराचा भरणा प्रत्येक नागरिकांनी करणे आवश्यक आहे. मार्च अखेरपर्यंत १०० टक्के उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व करसंग्राहकांना सुटीच्या दिवशी कामे करण्याबाबत व रात्रीही कार्यालये उघडे ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व अधिकारी, कर्मचारी करवसुलीसाठी मोलाचे प्रयत्न करीत आहेत.
-वसंत इंगोले
मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम
 
शहरातील थकीत कर असलेल्या नागरिकांनी कराचा भरणा करुन कारवाई टाळावी. कराचा भरणा वेळेत न करणाºया व्यक्तिंवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नळ कनेक्शन सुध्दा बंद करण्यात येणार असल्याने कराचा भरणा करुन या कारवाईस टाळावे व नगरपरिषदेला सहकार्य करावे
-अ.अजिज अ. सत्तार
कर निरिक्षक, वाशिम नगरपरिषद

Web Title: Employees' of tax department on duty on holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.