मतदार नोंदणी मोहिमेसंदर्भात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 04:37 PM2019-03-01T16:37:43+5:302019-03-01T16:37:47+5:30

वाशिम : २ व ३ मार्च २०१९ रोजी वाशिम तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर राबविण्यात येणाºया विशेष मतदार नोंदणी मोहीमेसंदर्भात १ मार्च रोजी वाशिम तहसिल कार्यालयात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले.

Employees training for voter registration campaign! | मतदार नोंदणी मोहिमेसंदर्भात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण !

मतदार नोंदणी मोहिमेसंदर्भात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : २ व ३ मार्च २०१९ रोजी वाशिम तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर राबविण्यात येणाºया विशेष मतदार नोंदणी मोहीमेसंदर्भात १ मार्च रोजी वाशिम तहसिल कार्यालयात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले.
अद्याप मतदार यादीत नाव न नोंदविलेल्या पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविता यावे, याकरिता २ मार्च व ३ मार्च २०१९ रोजी सर्व मतदान केंद्रांवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी ऋषीकेश मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची इत्यंभूत माहिती देण्यासाठी तहसिल कार्यालयातील सभागृहात दोन टप्प्यात संबंधित बीएलओ आणि कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या टप्प्यात सकाळी ११ वाजता शहरातील तसेच दुसºया टप्प्यात दुपारी ३ वाजता ग्रामीण भागातील बीएलओ व कर्मचाºयांना प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन करण्यात आले. 
यावेळी तहसिलदार विजय साळवे, निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार दीपक दंडे यांनी बीएलओ व कर्मचाºयांना मार्गदर्शन करताना एकूण २०८ कर्मचाºयांनीदेखील संबंधित त्या-त्या मतदान केंद्रांवर उपस्थित राहून जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी, अशा सूचना दिल्या.
पात्र नागरिकांना मतदार नोंदणीची संधी मिळावी म्हणून भारत निवडणूक आयोगाने २ व ३ मार्च २०१९ रोजी रोजी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर या विशेष मोहिमेचे आयोजन केले असून, या मोहिमेदरम्यान मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६ अर्ज, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अनिवासी मतदाराने नमुना ६ अ अर्ज, मतदार यादीतील नावास आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी नमुना ७ अर्ज, मतदार यादीतील नोंदीच्या तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी नमुना ८ अर्ज अथवा मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी नमुना ८ अ अर्ज सादर करता येतील. सर्व अर्जांचे नमुने संबंधित मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले.

Web Title: Employees training for voter registration campaign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम