कारंजा आगार प्रमुखांविरुद्ध कर्मचारी आक्रमक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:10 AM2017-09-18T01:10:56+5:302017-09-18T01:11:32+5:30
कारंजा लाड येथील आगारप्रमुखांकडून डयूटी अलोकेशन पद्धतीमुळे कर्मचारी वर्ग त्रस्त झाला आहे. या संदर्भात कर्मचारी संघटनेच्यावतीने आगारप्रमुखांकडे वारंवार चर्चा करूनही त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या कारंजा शाखेने रविवारी सभा घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड: येथील आगारप्रमुखांकडून डयूटी अलोकेशन पद्धतीमुळे कर्मचारी वर्ग त्रस्त झाला आहे. या संदर्भात कर्मचारी संघटनेच्यावतीने आगारप्रमुखांकडे वारंवार चर्चा करूनही त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या कारंजा शाखेने रविवारी सभा घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन आगार कारंजाचे कर्मचारी आगार व्यवस्थापक हे कर्मचार्यांबाबत पक्षपाती धोरण अवलंबून डयुटी अलोकेशनमध्ये कर्मचार्यांना वेठीस धरण्याचा प्रकार करीत आहेत. या प्रकाराबाबत त्यांनी आगार प्रमुखां शी चर्चाही केली आहे. तथापि, त्याचा काहीच फायदा झाला नाही. आगारप्रमुखांच्या या धोरणाला कर्मचारी कंटाळून गेल्यामुळे त्यांनी सोमवारी सभेचे आयोजन केले आहे. या सभेत सर्व कर्मचार्यांच्यावतीने सामुहिक निर्णय घेऊन त्या संदर्भात आगारप्रमुखांना माहिती देण्यात येणार असून, त्यानंतरही वाहक, चालकांच्या ड्यूटी अलोकेशनसह इतर समस्यांबाबत विचार करून धोरणात बदल न केल्यास संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष गजानन तिडके व सचिव संजय भिवरकर यांनी दिला आहे.
कर्मचार्यांना नियमानुसार आणि मनुष्यबळाचा विचार करून डयुटी देण्यात येते. इच्छेनुसार डयुटी लावणे शक्य नाही. आपण कोण्याही कर्मचार्याला वेठीस धरले नाही.
- अभिजीत चौधरी
आगारप्रमुख कारंजा