राजगाव येथे महिला हक्क जागरुकता कार्यशाळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 02:24 PM2018-11-03T14:24:32+5:302018-11-03T14:24:52+5:30

वाशिम: तालुक्यातील राजगाव येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई व गणेश स्वयं सहायता शेतकरी गट राजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता महिला हक्क जागरुकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

Empower women's Awareness Workshop | राजगाव येथे महिला हक्क जागरुकता कार्यशाळा उत्साहात

राजगाव येथे महिला हक्क जागरुकता कार्यशाळा उत्साहात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम: तालुक्यातील राजगाव येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई व गणेश स्वयं सहायता शेतकरी गट राजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता महिला हक्क जागरुकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महिलांचा मानसन्मान वाढावा, महिलांत निर्भयता यावी, त्यांना कायद्याचे ज्ञान मिळून त्यांच्या हक्काची त्यांना जाणीव व्हावी या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन मानसिक रोग तज्ञ डॉ. नरेश इंगळे, यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शोभा अहिरे होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडारे, सहाय्यक पोलीस निरिक्षक अजयकुमार वाढवे,  तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगीरकर, गुण नियंत्रक साठे, राजेश दारोकार, अंनिसचे कार्याध्यक्ष पी.एस. खंदारे, विधिज्ञ अ‍ॅड. गितांजली गवळी, ग्रा.पं. सचिव गजानन गवळी, बालाजी गंगावणे, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद अहिरे, उपसरपंच संजय कांबळे, परिमल कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष माधव पवार, पोलीस पाटील विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी महिलांना त्यांचे हक्क आणि कायद्याबाबत मार्गदर्शन केले.

Web Title: Empower women's Awareness Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.