शहरात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ‘नाॅनमाेटाराईजड ’वाहतुकीस प्राेत्साहन - दीपक माेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 03:02 PM2020-12-24T15:02:00+5:302020-12-24T15:09:36+5:30
शहरात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ‘नाॅनमाेटाराईजड ’वाहतुकीस प्राेत्साहन देण्यात येणार आहे.
वाशिम : शहरामध्ये माझी वसुंधरा अभियानांतर्गंत सायकल स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. यासंदर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक माेरे यांची घेतलेली मुलाखत.
सायकल स्पर्धेच्या आयाेजनाचा मुख्य उद्देश?
महाराष्ट्र शासनाच्या निदेशानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहा महिन्याच्या कालावधीत ‘माझी वसुंधरा अभियान राबविण्याच्या अनुषंगाने वाशिम शहरात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी नाॅन माेटाराईजड ’वाहतुकीस प्राेत्साहन देण्यासाठी वाशिम नगरपरिषदेच्यावतने सायकल रॅलीचे आयाेजन करण्यात आले आहे.
माझी वसुंधरा अभियानाचा उद्देश ?
माझी वसुंधरा अभियान पृथ्वी ,वायु ,जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबधित पंचतत्वार आधारित हे अभियान असून राजयातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये २ ऑक्टाेबर ते ३१ मार्च २०२१ राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध उपक्रमांचा समावेश आहे.
माझी वसुंधरा अभियानात काेणकाेणते उपक्रम आहे?
माझी वसुंधरा अभियानामध्ये हरित अच्छादन आणि जैवविविधता : वृक्षाराेपण, घण कचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन, रेन वाॅटर हार्वेस्टींग व परकाेलेशन, नदी , तळे नाले याची स्वच्छता, सांडपाणी मेैला व्यवस्थापन प्रक्रीया,
पयार्वरण सुधारणा व संरक्षणासाठी जनजागृतीसह विविध उपक्रमाचा समावेश आहे
सुरुवात सायकल स्पर्धेपासूनच का?
सायकलिंगमुळे इंधन बचत हाेते हाणीकारक वायू वातावरणात पसरत नसून प्रदूषण देखिल कमी हाेते . यामुळे वातावरणात सकारात्मक बदल घडून येउ शकताे. यामुळे येणाऱ्या पिढीला शुध्द हवा मिळू शकेल .