अतिक्रमित ‘ई-क्लास’ जमिनीवर होणार वृक्षारोपण!

By admin | Published: May 9, 2017 07:37 PM2017-05-09T19:37:33+5:302017-05-09T19:37:33+5:30

वृक्षारोपण करण्याचा निर्णय वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी मंगळवारी घेतला आहे.

The encroached 'e-class' will be planted on the ground! | अतिक्रमित ‘ई-क्लास’ जमिनीवर होणार वृक्षारोपण!

अतिक्रमित ‘ई-क्लास’ जमिनीवर होणार वृक्षारोपण!

Next

वाशिम : देखभाल-दुरूस्ती व सरंक्षणासाठी ग्रामपंचायतीच्या ताब्यात असणाऱ्या ई-क्लास जमिनींवर वृक्षारोपण करण्याचा निर्णय वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी मंगळवारी घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील अतिक्रमित जागेवरील अतिक्रमण निघण्यासोबतच वृक्ष लागवडीमुळे पर्यावरणाचे संरक्षण होऊन  गावातील जनावरांसाठी गायरान देखील सुध्दा तयार होईल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
ग्रामपंचायतीकडे निहित असलेल्या ई- क्लास जमिनीवर बऱ्याचदा शेतीसाठी व इतर कारणांसाठी अतिक्रमण झालेले असते. या जमिनीतील वृक्षतोडीमुळे गावातील गायरान नष्ट झाले आहे. या जमिनीवर पुन्हा नव्याने वृक्ष लागवड केल्यास पर्यावरणाचे रक्षण होईल आणि गायरान तयार झाल्यामुळे गावातील जनावरांना चारा उपलब्ध होईल. सद्या अतिक्रमित जमिनीवर कुठलेच पीक नसल्याने अतिक्रमणधारकांचे नुकसान होणार नाही. अतिक्रमण झालेल्या सर्व जमिनी ग्रामपंचायतने वृक्ष लागवडीसाठी आतापासूनच ताब्यात घेऊन त्यामध्ये खड्डे खोदून ठेवण्याच्या सुचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत. १ जुलै ते ७ जुलैदरम्यान वृक्ष लागवड सप्ताह राबविला जाणार असून या कालावधीत प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान एक हजार वृक्ष लागवड करावी. त्यासाठी ३१ मे पुर्वी ग्रामसेवकांनी खड्डे खोदून तयार ठेवण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिले आहेत.

Web Title: The encroached 'e-class' will be planted on the ground!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.