वाशिम शहरातील अतिक्रमणावर चालला गजराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 04:42 PM2018-10-01T16:42:10+5:302018-10-01T16:42:57+5:30
वाशिम : शहरातील मुख्य मार्गांवर फोफावलेले अतिक्रमण हटविण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. त्यानुसार, पोलिस बंदोबस्तात तथा जेसीबीच्या सहाय्याने सोमवार, १ आॅक्टोबर रोजी बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम शहर हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असताना शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर कच्चा स्वरूपातील अतिक्रमणासह पक्क्या अतिक्रमणाचा मुद्दाही गंभीर झाला आहे. यामुळे रहदारीस वारंवार अडथळा निर्माण होत असल्याने अतिक्रमण हटविण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला. जिल्हाधिकाºयांच्या आदेशावरून ही मोहिम सोमवारपासून राबविण्यास सुरूवात करण्यात आली. १ अधिकारी आणि १२ पोलिस कर्मचाºयांच्या बंदोबस्तात पहिल्या दिवशी बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. यादरम्यान काही लघुव्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने हटविली; तर काही दुकाने जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आल्याचे दिसून आले. मंगळवार, २ आॅक्टोबरला गांधी जयंती असल्याने यादिवशी ही मोहिम बंद ठेवून बुधवार, ३ आॅक्टोबरपासून पूर्ण गतीने शहरातील सर्वच मार्गांवर वाढलेले अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.