पांदन रस्ते अडकले अतिक्रमणाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 03:07 PM2019-05-12T15:07:50+5:302019-05-12T15:08:23+5:30
वाशिम : जिल्ह्यातील ६५० पैकी जवळपास २५० रस्त्यांवरील अतिक्रमण अद्याप काढ०यात आले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील ६५० पैकी जवळपास २५० रस्त्यांवरील अतिक्रमण अद्याप काढ०यात आले नाही.
शेतकºयांना शेतात ये-जा करणे, मालाची ने-आण करणे यासाठी पांदन रस्त्यांची निर्मिती झाली. तथापि, प्रत्येक शेतशिवारात अशा स्वरूपातील रस्त्यांची सुविधा असली तरी, अनेक रस्त्यांवर काही व्यक्तींकडून अतिक्रमण करण्यात आलेले आहे. परिणामी, शेतकºयांना शेतात पिकलेल्या शेतमालाची वाहतूक करणे कठीण होते. विशेषत: पावसाळ्यात हा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करतो. याबाबत शेतकºयांकडून महसूल विभागाकडे तक्रारीही केल्या जातात. त्याची दखल घेवून गतवर्षी महसूल विभागाने पांदन रस्त्यांवर झालेले अतिक्रमण हटविण्याची व्यापक मोहिम हाती घेतली होती. यामाध्यमातून जिल्ह्यातील ४०० रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले; परंतु उर्वरित ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे कार्यवाही करणे प्रशासनाला शक्य झाले नाही. तसेच त्यानंतर महसूल विभागाकडूनही मोठ्या स्वरूपातील मोहिम हाती घेण्यात आली नाही. यामुळे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या रस्त्यांसह अतिक्रमणमुक्त झालेल्या पांदन रस्त्यांची स्थिती देखील ‘जैसे थे’ झाली आहे.